Amitabh Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan: रतन टाटांच्या पहिला अन् शेवटच्या चित्रपटात होते बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन

Manasvi Choudhary

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज 82 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अमिताभ बच्चन यांचे सिनेसृष्टीत मोलाचे योगदान आहे. अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दित अनेक चित्रपट हिट ठरले तर काही चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. अमिताभ बच्चन यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या पहिल्या आणि शेवटच्या चित्रपटात काम केले आहे. व्यवसाय क्षेत्रात स्थान निर्माण करणाऱ्या रतन टाटा यांना चित्रपटसृष्टीत पैसे गुंतवायचे होते. रतन टाटा यांना चित्रपटांमध्ये रस होता. यामुळेच त्यांनी चित्रपटसृष्टीत पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला.

२००४ मध्ये रतन टाटा यांनी पहिला चित्रपट बनवला. या चित्रपटाच्या माध्यामातून रतन टाटा यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला. रतन टाटा यांच्या पहिल्या चित्रपटाचं नाव 'ऐतबार' आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. विक्रम भट्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा या चित्रपटात सहभाग होता.

चित्रपटाची कथा मुलगी आणि वडिलांची आहे. मुलीला तिच्या वेड्या प्रियकरापासून वाचवण्यासाठी बापाची धडपड या चित्रपटातून समोर येते. चित्रपटात अभिनेत्री बिपाशा बसूने मुलीची भूमिका साकारली आहे तर बिग बींनी वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी रतन टाटा यांनी ९.५० कोटी रूपये खर्च केले होते. मात्र या चित्रपटाने भारतात ४.२५ कोटी रूपये कमावले, तर जगभरात या चित्रपटाने ७.९६ कोटी रूपयांची कमाई केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra Leaves: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पाने का वाटतात? कारण वाचा

Dhule Corporation : ठाकरे गटाकडून रावणाची प्रतिकृती जाळून निषेध; विकास निधीत भाजपकडून भ्रष्टाचार केल्याचा आरोप

Elephant Age: हत्ती किती वर्ष जगतात?

Maharashtra News Live Updates : लवकरच नानापर्व!पुण्यात झळकले नाना पटोले यांचे फ्लेक्स

CM Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होणार, कुणाचं नाव देणार; एकनाथ शिंदेंनी सर्व काही सांगितलं!

SCROLL FOR NEXT