Ratan Tata
Ratan Tata Saam Tv
मनोरंजन बातम्या

New Biopic Movie: रतन टाटांचा बायोपिक येणार, त्यांच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता…

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ratan Tata: साधे आणि दिलदार व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले रतन टाटा सर्वश्रुत आहेत. रतन टाटा नेहमीच आपल्या परीने महाराष्ट्रावर संकट ओढावल्यानंतर मदतीला धावून येत असतात. त्यांच्या कामाची ख्याती सर्व जगालाच माहित आहे. त्याच कामाची पोचपावती म्हणून त्यांच्या जीवनावर आधारित प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच चित्रपट येत आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे. आतापर्यंत बॉलिवूडने अनेक खेळाडूंचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे, राजकारण्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आणले. आता तेच बॉलिवूड टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मित करण्यात येणार आहे. टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या बायोपिकवरील संशोधन सध्या अंतिम टप्प्यात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुधा कोंगारा यांनी केले आहे.

रतन टाटा यांच्या बायोपिकच्या चित्रीकरणाला २०२३ च्या अखेरीस सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. “रतन टाटा हे आपल्या देशातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांची कथा रुपेरी पडद्यावर साकारणे ही अभिमानाची बाब आहे,” अशी सूत्रांनी एका इंग्लिश संकेतस्थळाला मुलाखत देताना सांगितले आहे.

चित्रपटात रतन टाटांच्या जीवनातील वेगवेगळे पैलू चित्रित करण्यात येणार असून याव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टींचा उलगडा या चित्रपटाच्या माध्यमातून अशा गोष्टींचा उलगडा केला जाणार आहे, ज्या गोष्टी सार्वजनिकरित्या लोकांना माहीत नाहीत. त्यांचं आयुष्य जगभरातील प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी प्रेरणा देणारे आहे. या बायोपिकच्या कथेचं काम सुरू असून २०२३च्या अखेरीस या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे.

दरम्यान एका इंग्लिश संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांच्या बायोपिकमधील मुख्य भूमिकेसाठी अभिनेता अभिषेक बच्चन तसेच दाक्षिणात्य अभिनेता सूर्या यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. सध्यातरी यााबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

CSK Vs SRH : ऋतुराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT