Richa Chadha
Richa Chadha Saam Tv

Richa Chadha: निर्माते अशोक पंडित यांची अभिनेत्री रिचा चढ्ढा विरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार

रिचा चढ्ढाच्या या वक्तव्यामुळे देशवासीयांमध्येही प्रचंड नाराजी पसरली होती.सोबतच काल रिचावर बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शकांनी तिच्यावर टीका केली आहे.
Published on

Richa Chadha: अभिनेत्री रिचा चढ्ढा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. नुकतीच रिचाची एक पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. गलवान खोऱ्याबाबत केलेल्या ट्विटमुळं ती टीकेची नेटकऱ्यांच्या टीकेची धनी ठरली होती. मात्र, टीका झाल्यानंतर रिचानं आता माफी मागितली आहे.

Richa Chadha
Richa Chaddha: अभिनेत्री रिचा चड्ढानं भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप; आधी 'ते' ट्विट केलं, नंतर मागितली माफी

रिचा चढ्ढाच्या या वक्तव्यामुळे देशवासीयांमध्येही प्रचंड नाराजी पसरली होती.सोबतच काल रिचावर बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शकांनी तिच्यावर टीका केली आहे. जवानांचा अपमान केल्याप्रकरणी चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात रिचा चढ्ढा विरोधात तक्रार करण्यासाठी अर्ज दिला आहे.

अशोक पंडित यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की अभिनेत्री रिचाने भारतीय जवानांचा अपमान केला आहे. खास करून गलवान खोऱ्यामध्ये जे भारतीय जवान शहीद झाले त्या जवानांच्या बलिदानाची तिने खिल्ली उडवली आहे. तिचे हे कृत्य जवानांचा अपमान करणारा असून तिच्या विरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मात्र या विषयावर रिचाने यापूर्वीच माफी मागितली आहे.

Richa Chadha
Alia-Ranbir Daughter Name: आलिया-रणबीरने अखेर सांगितले मुलीचे नाव, जाणून घ्या काय आहे तिच्या नावाचा अर्थ?

रिचाने ट्विट करताच सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. भारतीय लष्कराचा अपमान केल्याबद्दल त्यांना ट्रोल केले जाऊ लागले. भाजप, विश्व हिंदू परिषदेपासून ते सर्वसामान्यांपर्यंत ऋचाची ही टिप्पणी अत्यंत चुकीची असल्याचे सांगण्यात आले. चित्रपट निर्माते अशोक पंडित म्हणतात, " भारताचे नागरिक या नात्याने, जे लोक आपल्या सुरक्षा दलांविरुद्ध चुकीची टिप्पणी करतात.

त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणे ही आपली जबाबदारी आहे. सैन्य आपले आणि देशाचे रक्षण करते, त्यामुळे त्यांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोही मानले पाहिजे. मला असे वाटते की मी देशभक्त असल्याने तिच्या विरोधात तक्रार दाखल करावी. पोलिस आता तिच्यावर कायद्यानुसार पुढील कारवाई करतील. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com