रश्मिका मंदाना सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे.
रश्मिकाने नुकतेच मासिक पाळीवर एक विधान केले आहे.
"पुरुषांना मासिक पाळीच्या वेदना एकदातरी जाणवल्या पाहिजेत", असे रश्मिका म्हणाली.
साऊथ सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. रश्मिका आणि अभिनेता विजय देवरकोंडा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोले जात आहेत. रश्मिका आणि विजय अनेक काळापासून डेट करत आहेत. तसेच त्यांचा साखरपुडा झाल्याचेही बोले जात आहे. अशात रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती मासिक पाळीबद्दल बोलली आहे.
जगपती बाबू यांच्या 'जयम्मु निश्चयम्मु रा' (Jayammu Nischayammu Raa with Jagapathi Babu ) कार्यक्रमात रश्मिका मंदानाने "पुरुषांना मासिक पाळीच्या वेदना एकदातरी जाणवल्या पाहिजेत" असे वक्तव्य केले. तिचे हे विधान खूप व्हायरल होत आहे. ती मुलाखतीत म्हणाली, "पुरुषांना किमान एकदा तरी मासिक पाळी यावी. जेणेकरून त्यांना स्त्रियांना होणाऱ्या वेदना कळतील. हार्मोनल इम्बॅलन्समुळे जो त्रास आम्हाला होतो, ते पुरुषांना कधी कळणार नाही. त्यामुळे पुरुषांना एकदा तरी मासिक पाळी आली पाहिजे, ज्यामुळे त्यांना ती कशी असते हे तरी समजेल..."
रश्मिका मंदानाच्या या विधानावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. काहींनी त्यांच्या या विधानाला पाठिंबा दिला तर काहींनी रश्मिका ट्रोल केले. तेव्हा एका चाहत्यांनी रश्मिकाची बाजू घेत तिचा व्हिडीओ शेअर केला. ज्यावर रश्मिकाने कमेंट केली. ती म्हणाली, "याबद्दल कुणीही बोलणार नाही. शो आणि इंटरव्यूमध्ये येण्याबद्दलची मला जी भीती वाटते, ती अशा गोष्टींमुळेच. माझा हेतू काही वेगळा असतो आणि त्याच वेगळाच अर्थ काढला जातो".
रश्मिका मंदानाने स्वतःचा मासिक पाळीचा अनुभव सांगत म्हणाली, मला मासिक पाळीच्या भयानक वेदना होतात. एकदा तर मी चक्कर येऊन पडले होते. मी अनेक टेस्ट केल्या आणि डॉक्टरांचा सल्लाही घेतला. प्रत्येक महिन्यात मला हा विचार येतो, देवा! तू मला इतका त्रास का देतोस? हा अनुभव स्वत: घेतल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे मला वाटते पुरुषांना एकदा तरी मासिक पाळी अनुभवायला हवी..."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.