bigg boss season 16 Saam TV
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna Bigg Boss 16: सलमानला रश्मिकाने दिली 'प्यार की बुटी': 'वीकेंड वार'ची सगळीकडे हवा

'बिग बॉस १६'ला लावली रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता यांनी हजेरी. सलमान खान सोबत केली खूप धमाल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'बिग बॉस १६'च्या (Bigg Boss) पहिल्या 'वीकेंड वार'मध्ये सलमान खानने खूप धमाल केलेली आहे. सलमान खानने घरामध्ये जाऊन सर्व स्पर्धकांची शाळा सुद्धा घेतली. रविवारच्या भागात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता दिसणार आहेत. 'गुडबाय' चित्रपटाच्या (Movie) स्टारकास्टने 'बिग बॉस १६'ला हजेरी लावली होती.

प्रोमोची सुरुवात सलमान खानच्या "मला तुमच्यासोबत गेम खेळायची इच्छा आहे" या वाक्याने होत आहे. रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता त्यांच्या ओठांच्या हालचालीवरून त्या काय बोलत आहेत हे सलमानला या गेममध्ये ओळखायचे होते. हेडफोन लावलेल्या सलमानला रश्मिकाने बोललेले "प्यार कि बुटी" हे वाक्य ओळखता आले नाही. या गेमच्या माध्यमातून तिघांनीही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. हा एपिसोड ८ ऑक्टोबरला रात्री ९:३० वाजता प्रदर्शित होणार आहे.

काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना आणि सलमान खान एका कार्यक्रमात दिसले होते. या कार्यक्रमातील त्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. रश्मिका मंदाना आणि सलमान खान यांनी पुष्पा चित्रपटातील 'सामी सामी' गाण्यावर डान्स केला होता. हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

सध्या रश्मिका तिच्या बॉलीवूड डेब्यूमुळे खूप व्यस्त आहे. तिने गुडबाय या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये (Bollywood) डेब्यू केला आहे. तिचा 'गुडबाय' (Goodbye) हा चित्रपटात ७ ऑक्टोबरला, २०२२ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानाच्या वडिलांची भूमिका अमिताभ बच्चन आणि आईच भूमिका नीना गुप्ता साकारत आहे. सुनील ग्रोवर (Sunil Grover) आणि पावियल गुलाटी मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. 'क्वीन' आणि 'सुपर ३०'चे दिग्दर्शक विकास बहाल यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : युद्ध भडकलंय तरी पेट्रोल,डिझेल भडकणार नाही? कसे?

Clove Benefits: उन्हाळ्यात लवंग का खातात?

Genelia Deshmukh: 'पिंक स्वॅग...'; जिनिलीया देशमुखचा ग्लॅमरस पिंक बार्बी लूक व्हायरल

Maharashtra Live News Update: ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ठता, राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने उद्धव ठाकरेंचा अबोला

Dombivli to Thane Bus: डोंबिवलीवरुन ठाण्याला फक्त २० रुपयात; केडीएमटीने सुरु केली नवी बससेवा

SCROLL FOR NEXT