Rashmika-Vijay Wedding  saam tv
मनोरंजन बातम्या

Rashmika-Vijay Wedding : रश्मिका-विजयची लग्नपत्रिका आली समोर; हैदराबादमध्ये पार पडणार शाही विवाह सोहळा, रिसेप्शन कुठे अन् कधी?

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding Card : साउथची प्रसिद्ध जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा खूप वेळापासून एकमेकांना डेट करत आहेत.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा फेब्रुवारी महिन्यात लग्न बंधनात अडकणार आहे.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणारी रश्मिका मंदाना लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. गेल्या खूप वेळापासून रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हे इंडस्ट्रीतील एक क्युट कपल आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे आता लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल चर्चा रंगली होती. आता मात्र याचा खुलासा झाला आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाची लग्नपत्रिका फिल्मफेअरने सोशल मीडियावर शेअर केली आहे. पत्रिकेवर विजय देवरकोंडाचे नाव दिसत आहे. ही पत्रिका विजयकडून लग्नाच्या आमंत्रणासाठी देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. लगीन घटिका समीप अली असली तरी अजून रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने आपल्या नात्यावर, लग्नावर कोणतेही भाष्य किंवा अधिकृत माहिती दिली नाही.

रश्मिका - विजयच्या लग्नाची तारीख काय?

व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी 2026 ला लग्न बंधात अडकणार आहे. तर लग्नाचे रिसेप्शन 4 मार्चला थाटामाटात पार पडणार आहे. लग्न सोहळा आणि रिसेप्शन दोन्ही हैदराबादमध्ये होणार आहे. चाहते या ग्रँड वेडिंगची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 2018 ला रिलीज झालेल्या गीता गोविंदम चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांचा 2019 साली रिलीज झालेला डियर कॉमरेड चित्रपटही खूप गाजला. चाहत्यांना या दोघांना पुन्हा एकदा चित्रपटात पाहायचे आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा उरकला. जवळचे मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT