Khatron Ke Khiladi 13 Winner Dino James Instagram
मनोरंजन बातम्या

Khatron Ke Khiladi 13 Winner: रॅपर डीनो जेम्स ठरला ‘खतरों के खिलाडी १३’ विजेता; अलिशान कार, ट्रॉफीसह मिळाले लाखो रुपये

Dino James Wins Khatron Ke Khiladi 13: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी १३’ चा विजेता डीनो जेम्स (Dino James) ठरला आहे.

Chetan Bodke

Khatron Ke Khiladi 13 Winner Dino James

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘खतरों के खिलाडी १३’ चा नुकताच महाअंतिम सोहळा पार पाडला. यंदाच्या सीझनची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. टॉप ५ स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरशीची लढत झाली होती. डीनो जेम्स (Dino James) ‘खतरों के खिलाडी १३’चा विजेता ठरला आहे. यावेळी विजेत्याला ट्रॉफी, नवीकोरी मारुती स्विफ्ट कार आणि २० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.

अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा, मराठमोळा शिव ठाकरे, डीनो जेम्स, रश्मीत कौर या टॉप ५ स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान, बिग बॉस १६ नंतर प्रचंड चर्चेत राहिलेल्या शिव ठाकरेला टॉप ५ मध्ये समाधान मानावे लागले. खरं तर पहिल्या दिवसापासूनच शिव ठाकरेची विजेता म्हणून चर्चा होत होती. पण खतरनाक स्टंट करून डीनो जेम्सने आपलं नाव ट्रॉफीवर कोरले.

तब्बल १३ आठवडे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केल्यानंतर, धोकादायक स्टंट्स आणि काही मजेदार क्षणांनंतर, अखेर या सीझनचा विजेता घोषित झाला. यावेळी सर्वच स्पर्धकांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत होती. अनेक स्पर्धकांच्या चाहत्यांनी आपल्या आवडत्या स्पर्धकाला थेट विजेता म्हणूनही घोषित केलं होतं.

शनिवारी सायंकाळी या शोचा ग्रँड फिनाले होता. यावेळी ‘खतरों के खिलाडी १३’च्या विजेतेपदावर डीनो जेम्सने आपले नाव कोरले आहे. महाअंतिम सोहळ्यात खतरनाक स्टंटबाजी केल्यानंतर डीनोला ट्रॉफी, २० लाख रुपयांचे बक्षीस आणि नवीकोरी मारुती स्विफ्ट कार भेट म्हणून देण्यात आली.

‘खतरों के खिलाडी १३’मध्ये अर्चना गौतम, शिव ठाकरे, डेजी शाह, शीझान खान रश्मीत कौर, डिनो जेम्स, ऐश्वर्या शर्मा, निर्रा एम बॅनर्जी, रोहित बोस रॉय, रूही चतुर्वेदी, अंजुम फकीह, साउंडस मौफकीर, अर्जिता तनेजा आणि अंजली आनंद हे स्पर्धक सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT