Sunny Leone at Kenedy Premier
Sunny Leone at Kenedy PremierSaam TV

Sunny Leone Glamorous Look: IFFSA रेड कार्पेटवर सनी लिओनीचा जलवा; ‘केनेडी’तील अभिनयासोबतच लूकची तुफान चर्चा

Sunny Leone Photo: सनी लिओनी पिवळ्या स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये स्टनिंग दिसत होती.
Published on

Sunny Leone Look Anurag Kashyap Kenedy Premier:

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘केनेडी’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटातील सनी लिओनीच्या 'चार्ली' भूमिकेचे जगभरात कौतुक होत आहे. कान्सच्या अभूतपूर्व यशानंतर हा चित्रपट इतर अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित करण्यात आला.

सगळीकडे चित्रपटाचे आणि सनी लिओनीचा कौतुक झालं. दक्षिण आशिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सनी लिओनीने पुन्हा एकदा चमकली आहे. "केनेडी" मधील सनीचे पात्र प्रेक्षकांना खूपच आवडले आहे.

सनी लिओनी " केनेडी"च्या प्रीमियरसाठी 'आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ आशिया'मध्ये सहभागी झाली होती. या फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर सनी लिओनी पिवळ्या स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये स्टनिंग दिसत होती.

सनी लिओनोने 'आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ आशिया'मधील तिचा रेड कार्पेटवरील लूक सोहळ मीडियावर शेअर केला आहे.सनी लिओनीचा यलो आऊटफिट आणि त्यावरील वर्क खूपच सुंदर दिसत आहे. लाईट मेकअपमध्ये सनीचे सौंदर्य अधिक खुलले आहे. स्टायलिस्ट चांदनी मेहताने हा लूक स्टाईल केला होता.

Sunny Leone at Kenedy Premier
Dil Dosti Deewangi Released: स्मिता गोंदकर - चिराग पाटील यांचा 'दिल दोस्ती दिवानगी' रिलीज; दिमाखात पार पडला चित्रपटाचा प्रीमियर

सनी लिओनीने फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. 'खूप सुंदर', 'गोड' 'अप्रतिम', 'फॅब्युलस', 'गॉर्जस' अशा कमेंट सनी लिओनीचा चाहते तिच्या फोटो करत आहेत. दक्षिण आशियातील "केनेडी"च्या प्रीमियरमध्ये सनीवरून कोणाची नजर हटत नव्हती.

सनी देओलचे नुकतेच "मेरा पिया घर आया 2.0" हे गाणे प्रदर्शित झाला आहे. "मेरा पिया घर आया 2.0" इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हे गाणे माधुरी दीक्षितच्या गाण्याच्या रिमके व्हर्जन आहे. "कोटेशन गँग" या चित्रपटातून सनी लिओनी तमिळ चित्रपटसृष्टीतही पदार्पण करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com