Rape Case Registered Against Rahul Jain
Rape Case Registered Against Rahul Jain Saam TV
मनोरंजन बातम्या

Rahul Jain : गायक राहुल जैनवर बलात्काराचा गुन्हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

Rape Case Registered Against Rahul Jain : बॉलीवूड गायक-संगीतकार (Bollywood) राहुल जैनवर बलात्काराचा गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका ३० वर्षीय कॉस्च्युम डिजायनरने राहुल जैनवर बलात्काराचे आरोप केले आहेत. या प्रकरणात पीडित महिलेच्या फिर्यादीवरू ओशिवरा पोलीस (Mumbai Police) ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसरीकडे गायक राहुल जैनने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपण निर्दोष असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

काय आहे प्रकरण?

पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, राहुल जैन यांनी तिच्याशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला. त्यावेळी त्याने तिच्या कामाचं कौतुकही केलं. महिलेला त्याचा वैयक्तिक कॉस्च्युम डिजायनार म्हणून नियुक्त केले जाईल असे आश्वासन देऊन उपनगरातील अंधेरीतील उंच त्याच्या फ्लॅटवर भेटायला सांगितले.

महिला ११ ऑगस्ट रोजी जैन यांना त्यांच्या फ्लॅटमध्ये भेटायला गेली. त्यावेळी राहुल यांनी आपल्याला जबरदस्तीने बेडरूममध्ये नेत बलात्कार केला. असा आरोप पीडित महिलेनं केलं आहे. इतकंच नाही तर, विरोध केला असता जैन यांनी आपल्याला मारहाण तसेच पुरावे नष्ट करण्याचा आरोपही पीडित महिलेनं केलाय. (Rape Case Registered Against Bollywood Singer Rahul Jain

दरम्यान, राहुल जैन यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे. महिलेनं केलेले आरोप खोटे असून आपण सदरील महिलेला ओळखत नसल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. विशेष बाब म्हणजे, ऑक्टोबर 2021 मध्येही एका महिला बॉलीवूड गीतकार आणि लेखकाने राहुल जैन यांच्याविरुद्ध बलात्कार, बळजबरीने गर्भपात आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी पंतप्रधान मैदानात! श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची होणार सभा

Shani Dosh: तुम्हाला नेहमी अडचणी येतात? 'हे' आहेत शनिदोषाची लक्षणं

Today's Marathi News Live : मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावमधील सभेला कर्नाटक सरकारची परवानगी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्त्वाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार?

LSG sv RR : राजस्थानसमोर लखनौचं १९७ धावांचं लक्ष्य ; के.एल. राहुल, दीपक हुडाची कडवी टक्कर

SCROLL FOR NEXT