'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिजीत खांडेकर 'या' वेब सीरीजमध्ये दिसणार; पोस्ट शेअर करुन दिली माहिती

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेता अभिजीत खांडेकरने अल्पावधीतच आपल्या उत्तम अभिनयाने कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
Abhijeet Khandkekar
Abhijeet KhandkekarSaam Tv

मुंबई: लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडेकरने (Abhijeet Khandkekar)अल्पावधीतच आपल्या उत्तम अभिनयाने कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. अभिजीतने मालिका आणि सिनेमांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. मालिका आणि चित्रपटानंतर आता अभिजीत लवकरच ओटीटी प्लॅटफॅार्मवरही झळकणार आहे. अभिजीत खांडेकर लवकरच 'दुरंगा'(Duranga) या वेबसिरिजमध्ये दिसणार आहे. स्वतः अभिजीतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.

Abhijeet Khandkekar
Raksha Bandhan Collection: अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' सिनेमाही बॉक्स ऑफिसवर आपटला; परदेशात केली केवळ 'इतकी' कमाई

नुकतच, अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये या वेब सीरीजची झलक पाहायला मिळत आहे. या वेब सीरीजमध्ये नामांकित क्राईम रिपोर्टर विकास सोराडे यांची व्यक्तिरेखा अभिजीतने साकारली आहे. याशिवाय या वेब सीरीजमध्ये अभिनेता गुलशन देवैय्या आणि अभिनेत्री दृष्टी धामी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 'दुरंगा' ही वेब सीरीज पूर्णपणे सस्पेन्स थ्रिलरने भरलेली आहे. यामध्ये एक किलर शहरात अनेक निर्घृण हत्या करताना दाखविले आहे.

Abhijeet Khandkekar
Tiger 3 teaser : सलमान-कतरिनाची जोडी पुन्हा एकत्र दिसणार; चाहत्यांना पाहायला मिळणार जबरदस्त केमिस्ट्री

'दुरंगा' ही वेब सीरीज 'फ्लॉवर ऑफ एव्हिल' या कोरियन वेब सीरीजचा रिमेक आहे. या वेब सीरीजचा पहिला लूक लक्षवेधी आहे. अभिजीतची बायको अभिनेत्री सुखदा खांडेकरने सुद्धा या सीरीजचे पोस्टर शेअर करत अभिजीत आणि टीमला शुभेच्या दिल्या आहेत. 'मी या वेब सीरीजची आतुरतेने वाट पाहत होते. आता लवकरची मी ही वेब सीरीज पाहू शकते . ऑल द बेस्ट 'दुरंगा' असं सुखदाने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सध्या अभिजीत खांडेकर स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तुझेच गीत गात आहे' या मालिकेत काम करत असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. 'दुरंगा' या वेब सीरीजमध्ये बरखा सेनगुप्ता, राजेश खट्टर, दिव्या सेठ, झाकीर हुसेन सहाय्यक भुमिकेत असणार आहेत. 'दुरंगा' ही वेब सीरीज १९ ऑग्स्ट रोजी 'झी फाय'या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com