Raksha Bandhan Collection: अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' सिनेमाही बॉक्स ऑफिसवर आपटला; परदेशात केली केवळ 'इतकी' कमाई

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे मागील काही चित्रपट फ्लॉप झाले आहेत. त्यानंतर अक्षय 'रक्षा बंधन' या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा रुपेरी पडद्यावर परतला आहे.
Raksha Bandhan Movie
Raksha Bandhan MovieSaam Tv
Published On

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे(Akshay Kumar) मागील काही चित्रपट फ्लॉप झाले आहेत. त्यानंतर अक्षय 'रक्षा बंधन'(Raksha Bandhan) या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा रुपेरी पडद्यावर परतला आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशीच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटची धमाकेदार ओपनिंग होईल, अशी अपेक्षा होती. पण अक्षय पुन्हा एकदा चित्रपट सिनेमागृहांमध्ये आपली जादू चालवू शकला नाही.

Raksha Bandhan Movie
Tiger 3 teaser : सलमान-कतरिनाची जोडी पुन्हा एकत्र दिसणार; चाहत्यांना पाहायला मिळणार जबरदस्त केमिस्ट्री

अभिनेता अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा चित्रपट गुरुवारी, ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अक्षयचा हा चित्रपट सुपरस्टार आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटासोबत प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबतीत समीक्षकांना विश्वास होता की, 'अक्षय कुमारचा चित्रपट, जो भावा-बहिणीच्या प्रेमावर आधारित आहे, बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल'. पण 'रक्षाबंधन' चित्रपट काही खास चमक दाखवू शकला नाही. भारतात पहिल्या दिवशी ९ कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा चित्रपट चांगली कमाई करू शकला नाही. भारताबरोबरच परदेशातही अक्षय कुमारच्या या चित्रपटाने खास चमक दाखवली नाही.

Raksha Bandhan Movie
७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषात तल्लीन बॉलिवूड स्टार्स, 'या' स्टार्सनी केले ध्वजारोहण

अमेरिकेत 'रक्षा बंधन' चित्रपटाने तीन दिवसांत १.१२ कोटींची कमाई केली. मात्र इतर सर्व देशांमध्ये अक्षयच्या चित्रपटाने फक्त लाखोंची कमाई केली. 'रक्षा बंधन'ने यूकेमध्ये एकूण ५०.९७ लाख रुपयांचा गल्ला जमा केला. तर कॅनडात या चित्रपटाने ४०.०३ लाख रुपयांपेक्षा कमी कमाई केली. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये तीन दिवस उलटल्यानंतर अक्षयच्या या सिनेमाने फारशी कमाई केली नाही.

तर ऑस्ट्रेलियामध्ये ३१.८९ लाख रुपयांची कमाई केली आहे. 'रक्षा बंधन' सिनेमाने परदेशातील बाजारपेठांमध्ये आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये सर्वात कमी व्यवसाय केला आहे. अक्षयच्या चित्रपटाने न्यूझीलंडमध्ये तीन दिवसांत केवळ १८.४७ लाखांची कमाई केली. या आकडेवारीनुसार, 'रक्षा बंधन'ने परदेशी बाजारपेठेत एकूण ३.४७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com