भारताच्या ऐतिहासिक विजयाची साक्ष देणाऱ्या 83चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर Saam Tv
मनोरंजन बातम्या

भारताच्या ऐतिहासिक विजयाची साक्ष देणाऱ्या 83चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर

अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे, '83' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (83 Movie Trailer Release) झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

83 Movie Trailer: अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे, '83' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (83 Movie Trailer Release) झाला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याचवेळी दीपिका पदुकोण (Deepika Padukon) त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. कोरोना (Corona) व्हायरसमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 3 मिनिट 49 सेकंदाचा हा ट्रेलर आहे. दिग्दर्शक कबीर सिंग हे आपल्याला 1983 च्या काळात परत घेऊन जातात, ज्यावेळेस भारताने पहिला विश्वचषक (World Cup) जिंकला होता.

हे देखील पहा-

कपिल देवच्या रुपात दिसला रणवीर सिंग;
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग, कपिल देव यांच्या लूकमध्ये दिसत आहे. रणवीरचा हा लूक थक्क करणारा आहे. रणवीर कपिल देवसारखा दिसून येत आहे. ट्रेलर तुम्हाला भारताच्या प्रवासात घेऊन जाणारा आहे. या प्रवासात तुम्हाला संघर्ष, विजय आणि पराभवही पाहायला मिळणार आहे. दीपिका पदुकोण देखील ट्रेलरमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये ती एका परफेक्ट सपोर्टिव्ह पत्नीच्या भूमिकेत दिसून येत आहे.

सोशल मीडियावर Social Media ट्रेलर शेअर करताना रणवीर सिंगने कॅप्शनमध्ये लिहिले की, "अंडरडॉग्सची खरी कहाणी ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. 83 चा ट्रेलर हिंदीमध्ये रिलीज झाला आहे. तो 24 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होईल. यासोबतच तो 3D मध्येही रिलीज होईल.

चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर त्यात ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतीन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, पंकज त्रिपाठी, हार्डी संधू, निशांत धाहिया, एमी विर्क, साहिल खट्टर, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर.बद्री आणि दीपिका पदुकोण दिसणार आहेत. या चित्रपटात दीपिका कपिल देव यांच्या पत्नी रोमीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT