Ranveer Singh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh Look: 'सिंघम अगेन'चा श्रीगणेशा! चित्रपटाच्या सेटवरील रणवीर सिंगचा फोटो व्हायरल

Singham Again Viral Photo: 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या सेटवरील रणवीर सिंगचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे.

Pooja Dange

Ranveer Singh Look From Singham Again Goes Viral:

अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या अभिनयाने स्वतःला सिद्ध केले आहे. रणवीर नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. रोमान्ससह अ‍ॅक्शन देखील तो तितक्याच दमदारपणे करतो.

रणवीर सिंगसाठी २०२२ हे वर्ष काही खास नव्हतं. पण २०२३ मध्ये रॉकी रंधावा बनून त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'रॉकी ओर रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील त्याचा लूक आणि डान्सने प्रेक्षकांची मने जिंकली.

रणवीर सिंग आता रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या सेटवरील त्याचा फर्स्ट लूक रिव्हील झाला आहे.

काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टी, अजय देवगण आणि रणवीर सिंग यांनी 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या मुहूर्त पूजा केली. त्याचे फोटो या कलाकारांनी शेअर केले होते. यावरून हे नक्की झालं की 'सिंघम अगेन' चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. रणवीर सिंगने आता याचे कन्फर्मेशन दिलं आहे.

रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. रणवीरने या फोटोमध्ये काळ्या रंगाचे स्लिव्हलेस टी-शर्ट आणि मॅचिंग ट्राऊजर घातले आहे. तसेच गॉगल देखील लावला आहे. हा फोटो रणवीरने सिंघम टायटल ट्रॅक आणि सिंबा स्टिकरसह पोस्ट केले आहे. तसेच बॅकग्राऊंडला 'आला रे आला' हे म्युजिक देखील लावले आहे. इतकेच नाही तर तो त्याच्या मिश्यांना देखील पीळ देत आहे.

अजय देवगणच्या 'सिंघम' चित्रपटाचा 'सिंघम अगेन' हा सिक्वेल आहे. 'सिंघम अगेन' कधी रिलीज होणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु अशी चर्चा आहे की 'सिंघम अगेन' पुढच्या वर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होईल. याच दिवशी अल्लू अर्जुनाचा 'पुष्पा २' देखील प्रदर्शित होणार आहे.

अजय देवगण आणि रणवीर सिंगसह अक्षय कुमार देखील या चित्रपटामध्ये दिसण्याची शक्यता आहे. 'सिंघम अगेन'च्या मुहूर्त पूजेच्या वेळी अक्षय कुमारने केलेल्या पोस्टमुळे याची अधिक चर्चा होत आहे.

Ranveer Singh Look

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT