Dhurandhar 2  saam tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh : 'धुरंधर २'च्या सेटवर रणवीर सिंह झाला होता गंभीर जखमी; शुटिंगदरम्यान नेमकं काय घडलं? सहकलाकाराने सगळंच सांगितलं

Ranveer Singh Injured On Dhurandhar 2 Set : 'धुरंधर २' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणवीर सिंह गंभीर जखमी झाला. याचा किस्सा सिनेमातील दुसऱ्या अभिनेत्याने सांगितला आहे.

Shreya Maskar

'धुरंधर 2' चित्रपट 19 मार्च 2026 ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

'धुरंधर २'ने जगभरात 800 कोटींचा टप्पा पार केला.

'धुरंधर २'च्या शूटिंग दरम्यान रणवीर सिंहला गंभीर दुखापत झाली.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने पाच दिवसांत जगभरात 800 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटासाठी रणवीर सिंहने खूप मेहनत घेतली आहे. जी त्याच्या अभिनयातून दिसत आहे. 'धुरंधर २' मध्ये अनेक ॲक्शन सीन आहेत. एक ॲक्शन सीन करताना रणवीर सिंहला गंभीर दुखापत झाली. याचा खुलासा चित्रपटातील अभिनेता गुरसेवक सिंहने केला आहे. त्याने एक सोशल मीडियावर पोस्ट करून प्रसंग सांगितला आहे. अमृतसरमध्ये शूटिंग करताना रणवीर सिंहच्या हाताला लागले. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

गुरसेवक सिंहची पोस्ट

"रणवीर सिंग इतका प्रेमळ व्यक्ती आणि एक उत्कृष्ट अभिनेता का आहे, हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो...आम्ही अमृतसरमधील जहाज घरमध्ये एका ॲक्शन सीनचे शूटिंग करत होतो, जो सीन चित्रपटातही आहे. मी रणवीर सिंगच्या मागे होतो आणि माझ्याकडे एक बॉम्ब होता, जो मला त्याच्या समोर ठेवायचा होता. त्यानंतर, ॲक्शन मास्टरने सांगितल्याप्रमाणे, मला ट्रॅक्टरवर जाऊन टायरच्या मध्ये स्वतःचे संरक्षण करायचे होते आणि मग रणवीर सिंगने मला कव्हर करायचे होते. आम्ही खूप सराव केला होता आणि सर्व काही अगदी व्यवस्थित चालले होते. पण माझ्याकडून एक चूक झाली आणि बॉम्ब ठेवायला दोन सेकंद जास्त लागले. मी निघताना, रणवीर सिंग आणि माझी खूप जोरात टक्कर झाली जणू काही ७० किमी/तास वेगाने कोणीतरी मला धडकले होते. मी टायरमध्ये पडलो आणि रणवीर सिंग माझ्यावर पडला.

रणवीर सिंगची बंदूक माझ्या पोटाला लागली आणि माझ्या बंदुकीची नळी त्याच्या कोपराला लागली. तो उठून बाजूला झाला. त्यालाही दुखापत झाली होती, पण मी बेशुद्ध पडलो होतो आणि मला काळजी वाटत होती की त्याला गंभीर दुखापत झाली असेल म्हणून. संपूर्ण टीम त्याच्यामागे धावली. सुमारे १५ सेकंदांनंतर, त्यांच्या लक्षात आले की मी सुद्धा तिथेच पडलो आहे. डॉक्टर माझ्याकडे आले, त्यांनी मला तपासले आणि सांगितले की माझ्या पोटाला गंभीर दुखापत झाली आहे आणि ते सुजले आहे. तेवढ्यात आदित्य धर सर तिथे आले. त्यांनी मला धीर दिला आणि म्हणाले, "ॲक्शनमध्ये असं होतं, घाबरू नकोस." मी त्यांना सांगितले की रणवीर सिंग सरांनाही दुखापत झाली आहे. ते म्हणाले, "ठीक आहे, आराम कर, हे शूटिंगचाच एक भाग आहे," आणि त्यांनी मला डॉक्टरला ते नीट तपासायला सांगितले.

जेव्हा रणवीर सिंगला हे कळले, तेव्हा तो स्वतः माझ्याकडे आला. मी घाबरलो आणि म्हणालो, "सर, सॉरी, ही माझी चूक होती." मी भीतीमुळे, वेदनेमुळे रडत होतो, पण भाईने एका मिनिटात मला शांत केले. तो म्हणाला, "गुरसेवक, ठीक आहे " आणि त्याने मला मिठी मारली. आम्ही जवळपास एक मिनिटभर तसेच उभे राहिलो. माझे डोळे पाण्याने भरले होते. त्यांच्या प्रेमाने मी पूर्णपणे भारावून गेलो होतो. मग त्यांनी माझी जखम पाहिली आणि विचारलं, "शूट करणार की थोडा वेळ विश्रांती घेणार?"

मी हिम्मत गोळा करून म्हणालो, "हा शेवटचा सीन आहे, त्यामुळे तुम्ही करत असतानाच मी पण करतो." मी विचारलं, "सर, तुम्हाला किती लागलंय?" ते म्हणाले, "कोपर दुखतंय. व्यायाम करताना थोडं अवघड जाईल, पण हरकत नाही चला सीन करूया." मग आम्ही तो सीन पूर्ण केला. हे शूटिंगच्या तिसऱ्या दिवशी घडलं. त्यानंतर आम्ही आणखी ३५ दिवस शूटिंग केलं."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2026: सोनं परवडत नाही? अक्षय तृतीयेला घरी आणा 'या' ३ गोष्टी; वर्षभर राहील सुख-समृद्धी!

Maharashtra News Live Update : 16 ते 18 एप्रिलदरम्यान जालना जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट..

Nepal tourism: हिमालयाच्या कुशीतला स्वर्ग! नेपाळमधील ही ठिकाणं तुमच्यासाठी ठरतील बेस्ट ऑप्शन

Weather Update: महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये उष्णतेची लाट; तर ८ राज्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा

Vande Bharat Sleeper : पुण्यातून धावणार वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस, सोलापूरकरांनाही फायदा, वाचा तिकीट अन् थांबे

SCROLL FOR NEXT