बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या तिचा आगामी चित्रपट 'धुरंधर'मुळे चांगलाच चर्चेत आहे. रणवीर सिंहच्या वाढदिवसाला 'धुरंधर'चा पहिली झलक पाहायला मिळाली. 'धुरंधर'मध्ये (Dhurandhar ) रणवीर सिंह मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या 'धुरंधर'च्या सेटवरून एक फोटो समोर आला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
'धुरंधर'च्या सेटवरून व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये पार्श्वभूमी पाकिस्तानी झेंडा दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान मधील युद्ध पेटले आहे. पाकिस्तान विरोधात भारतीय जनतेच्या मनातील राग वाढला आहे. त्यामुळे पाकिस्तान संबंधित छोट्या गोष्टी देखील नागरिकांना खटकायला लागल्या आहेत.
फोटोमधील पाकिस्तानी झेंड्यामुळे रणवीर सिंहला आता ट्रोल करण्यात आले आहे. हा फोटो पाहून नेटकरी आपल्या संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एकीकडे नेटकरी पाकिस्तानला नाव ठेवताना, बॉलिवूड आणि रणवीरला ट्रोल करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे प्रेक्षक रणवीर सिंहच्या बाजूने बोलताना देखील दिसत आहेत. पाकिस्तानी झेंडा हा चित्रपटाच्या शूटिंगचा भाग असल्याचे बोले जात आहे. चित्रपटात पाकिस्तानचे दृश्य दाखवण्यासाठी झेंडा लावला गेला असेल असे बोले जात आहे.
'धुरंधर' हा ॲक्शन चित्रपट आहे. चित्रपटात लांब केस, मोठी दाढी अशा ॲक्शन अवतारात रणवीर सिंह पाहायला मिळत आहे. 'धुरंधर' चित्रपटात रणवीरसोबत संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.'धुरंधर' चित्रपट आदित्य धर यांनी दिग्दर्शित केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.