Ranveer Singh  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh Get Trolled: अरे स्क्रिप्ट तरी बदल! अनुष्का-दीपिकाचे वर्णन करताना रणवीर असं काय म्हणाला?, नेटिझन्सनी उडवली खिल्ली

Koffee With Karan 8: रणवीरने त्यांच्या लव्ह लाईफमधील अनेक सिक्रेट या शोमध्ये सांगितले आहेत.

Pooja Dange

Ranveer Singh Describe Anushka-Deepika In Exact Same Word:

'कॉफी विथ करण सीजन ८'चा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला. या शोच्या पहिल्या भागात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलने हजेरी लावली होती.

'कॉफी विथ करण सीजन ८'च्या प्रोमोनंतर दीपिका आणि रणवीरचे अनेक व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. दरम्यान रणवीरचा आणखी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे रणवीर ट्रोल देखील होत आहे.

'कॉफी विथ करण सीजन ८'मध्ये रणवीरने दीपिकाशी झालेल्या भेटीचे वर्णन केले. तसेच त्याने तिला लग्नाची मागणी कशी घातली हे देखील सांगितलं. रणवीरने त्यांच्या लव्ह लाईफमधील अनेक सिक्रेट या शोमध्ये सांगितले. त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल देखील झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परंतु रणवीर आणि अनुष्का यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. २०११ साली या दोघांनी 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली होती. रणवीरने एक्स गर्लफ्रेंड अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला होता.

रणवीर 'रब ने बना दी जोडी' चित्रपट पाहिल्यानंतर अनुष्काला भेटला. 'रब ने बना दी जोडी' चित्रपटामध्ये अनुष्का शर्माला पाहून मी मंत्रमुग्ध झालो होतो. त्यानंतर आम्ही डिनरसाठी भेटलो. मी या मॉडेलसोबत होतो आणि मी संपूर्ण वेळ अनुष्काविषयी बोलत होतो.' असे रणबीर २०११ साली अनुष्का विषयी सांगितले होते.

संजय लीला भन्साली त्यांच्या 'राम-लीला' चित्रपटाची टीम जेव्हा या चित्रपटाच्या लीड रोलसाठी अभिनेत्रीचा विचार करत होते तेव्हा त्याच्या डोक्यात फक्त दीपिकाचाच विचार होता. त्याआधी त्याने दीपिकाचा 'कॉकटेल' चित्रपट पाहिला होता. (Latest Entertainment News)

अनुष्का आणि दीपिका यांना पहिल्यांदा भेटला होता तेव्हाची त्यांची एन्ट्री रणवीरने सांगितली. रणवीर म्हणाला, 'भव्य दरवाज्यातून ती आत आली. वाऱ्याने तिचे केस उडत होते आणि तिच्या चेहऱ्यावर येत होते.' दोन्ही अभिनेत्रींनसाठी रणवीरने तेच वर्णन केले.

रणवीर सिंगचा २०११ आणि २०२३ सालचा दोन्ही अभिनेत्रींचे वर्णन करणारा व्हिडीओ एकत्र करून एक व्हिडीओ बनविण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT