Ranveer Singh Apology: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने माफी मागितली आहे. त्याने नुकतेच गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) मध्ये व्यासपीठावरून "कांतारा: चॅप्टर १" मधील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे कौतुक केले. या कार्यक्रमादरम्यान, त्याने चित्रपटात दाखवलेल्या देवाचा उल्लेख महिला भूत म्हणून केला आणि विनोदी पद्धतीने ऋषभ शेट्टीच्या कृतीचे अनुकरण केले. यामुळे सोशल मिडियावर वाद निर्माण झाला. त्याच्यावर लोकांच्य धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. रणवीर सिंगने या प्रकरणाबाबत स्वतःचे स्पष्टीकरण आणि माफी मागितली आहे.
मंगळवारी, रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक निवेदन प्रसिद्ध केले. त्याच्या स्पष्टीकरणात त्याने लिहिले की, "माझा हेतू फक्त चित्रपटातील ऋषभच्या उत्कृष्ट कामावर प्रकाश टाकणे होता. मला माहिती आहे की तो देखावा करणे त्याच्यासाठी किती कठीण आहे आणि मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे. मी नेहमीच माझ्या देशातील सर्व संस्कृती, परंपरा आणि श्रद्धांचा आदर केला आहे. जर मी कोणाचे मन दुखावले असेल तर मी मनापासून माफी मागतो."
वाद काय आहे?
अलिकडेच, रणवीर सिंग भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सूत्रसंचालक म्हणून स्टेजवर दिसला. जेव्हा त्याने रजनीकांत आणि ऋषभ शेट्टी यांना स्टेजसमोर बसलेले पाहिले तेव्हा तो त्यांना भेटण्यासाठी खाली गेला. तो प्रथम रजनीकांतला भेटला आणि नंतर ऋषभ शेट्टीला पाहून तो खूप उत्साहित झाला. या दरम्यान रणवीरने चित्रपटात दाखवलेला चावुंडा (चामुंडा) देवीचा अभिनय ऋषभच्या समोरच केला. तथापि, त्याने नक्कल करायला सुरुवात करताच, ऋषभने त्याला असे करण्यापासून रोखले.
प्रथम त्याने प्रशंसा केली आणि नंतर थट्टा केली!
जेव्हा रणवीर स्टेजवर परतला तेव्हा त्याने प्रथम ऋषभ शेट्टीचे कौतुक केले आणि नंतर ऋषभने चित्रपटात देवीची भूमिका कशी साकारली होती त्याचे विनोदाने अनुकरण करण्यास सुरुवात केली. तो पुढे म्हणाला, "ऋषभ, मी कंतारा थिएटरमध्ये पाहिले. तू उत्तम अभिनय केलास. विशेषतः जेव्हा महिला भूत तुझ्या शरीरात प्रवेश करते. तो अभिनय, तो एक शॉट, खरोखरच अद्भुत होता." त्याचे कौतुक केल्यानंतर, रणवीर सिंग पुन्हा स्टेजवर त्या अभिनयाचे अनुकरण केले. या घटनेच्या एका व्हिडिओमुळे खूप गोंधळ उडाला आणि आता रणवीर सिंगला माफी मागावी लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.