Ranveer Allahbadia News social media
मनोरंजन बातम्या

Ranveer Allahbadia News: रणवीर अलाहबादियाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका!

Ranveer Allahbadia: रणवीर अलाहबादियाला सर्वोच्च न्यायालयानं दणका दिला आहे. अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल एफआयआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.

Saam Tv

प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये पालकांबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील टिप्पणी केली. त्याच्या या वक्तव्यानंतर त्याच्याविरुद्ध विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. आता रणवीरने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रणवीर आलाहाबादियाने याप्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी तातडीची सुनावणी करण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण प्रक्रियेनुसार हाताळण्यात येईल असे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणानंतर महाराष्ट्र सायबर सेल, मुंबई पोलीस आणि आसाम पोलिसांनी अलाहबादिया आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर त्यांना समन्स बजावले आहे.

या प्रकरणात रणवीरसह समय रैना, आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह, अपूर्वा मखिजा यांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात गुवाहाटीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अपूर्वा मखिजा आणि आशिष चंचलानी यांचे जबाब नोंदवले आहेत, मात्र समय त्याच्या‌ शोनिमित्त परदेशात असल्याने अद्यापही चौकशीसाठी हजर झालेला नाही.

समय रैनाच्या शोमध्ये रणवीरने विचारलेल्या अश्लील प्रश्नावरून देशभरात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर आसाम पोलिसांनी अश्लीलता आणि सार्वजनिक नैतिकतेशी संबंधित कलमांखाली रणवीर विरोधात गुन्हा दाखल केला. आसाम पोलिसांचं पथक सध्या रणवीर, समय रैना आणि इतरांना समन्स बजावण्यासाठी मुंबईत आहेत. तर या प्रकरणी पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

SCROLL FOR NEXT