Shaktimaan Mukesh Khanna on Ranveer Allahbadia Controversy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Allahbadia : रणवीर अलाहबादियावर 'शक्तिमान' भडकला, म्हणाला, त्याचं तोंड काळं करा अन् गाढवावरुन फिरवा!

Mukesh Khanna on Ranveer Allahbadia : यूट्यूबर रणवीर अलाहबादियाने 'इंडियाज गॉट लेटेंट' या कार्यक्रमामध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणावर शक्तिमान फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

Mukesh Khanna on Ranveer Allahbadia Controversy: यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात तो परीक्षक म्हणून उपस्थित होता. या भागामध्ये त्याने आई-वडिलांशी संबंधित वादग्रस्त वक्तव्य केले. या विधानामुळे तो प्रचंड ट्रोल झाला. त्याच्याविरोधात संतापाची लाट पसरल्याचे पाहायला मिळते.

रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानाची नोंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली आहे. सोशल मीडियावर रणवीरला लोक ट्रोल करत आहेत. त्याच्यावर कारवाई व्हावी असे म्हणत आहेत. या प्रकरणावर आता 'शक्तिमान' फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.

या पोस्टमध्ये मुकेश खन्ना म्हणतात, "रणवीर अलाहाबादियासारख्या यूट्यूबरने 'इंडियाज गॉट लेटेंट' या कार्यक्रमात केलेले विधान ऐकून फार वाईट वाटले. त्यांचे वक्तव्य पालक आणि सेक्सशी संबंधित होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या संपूर्ण देश संतप्त झाला आहे. यावरुन आपल्या देशातील तरुणांना भाषण स्वातंत्र्याचा गैरवापर करण्याचे सूट दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते."

"स्वांतत्र्यांची मर्यादा ओलांडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही यूट्यूबर्सनी अनेकदा त्यांच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. हा गंभीर गुन्हा आहे. याला हलक्यात घेतले जाऊ नये. याकडे दुर्लक्ष करता कामा नये. भविष्यात कोणी असे बेजबाबदार वक्तव्य करु नये यासाठी रणवीरला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. अशा लोकांसाठी माझ्याकडे एकच शिक्षा आहे. त्यांचे चेहरे काळे करा, त्यांना गाढवावर बसवा आणि त्यांना शहरातून फिरवा. याने पुढच्या वेळी कोणी असे वक्तव्य करणार नाही", असेही मुकेश खन्ना म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT