Ranveer Allahbadia Insta Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Allahbadia : 'मी पळणाऱ्यांपैकी नाही! पण भीती वाटतेय, पुढे काय वाढून ठेवलंय'; बेपत्ता रणवीर अलाहबादियाची पहिली पोस्ट व्हायरल

Ranveer Allahbadia Controversy : रणवीर अलाहबादियाला पोलिसांनी समन्स पाठवले होते. समन्सला उत्तर न दिल्याने तो बेपत्ता असल्याचे म्हटले जात होते. अशातच रणवीरने सोशल मीडियावर नवी पोस्ट शेअर केली आहे.

Yash Shirke

Ranveer Allahbadia : 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे यूट्यूबर रणवीर अलाहबादिया चांगलाच चर्चेत आला आहे. कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानांमुळे त्याच्यावर कारवाई होणार आहे. दरम्यान रणवीर पोलिसांच्या संपर्कात नसून त्याचा फोन देखील बंद असल्याचे म्हटले जात होते. अशातच बेपत्ता झाल्यानंतर रणवीरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये रणवीरने त्याच्या आईच्या दवाखान्यावर हल्ला केल्याची माहिती दिली आहे. 'मी आणि माझी टीम पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत. मी सर्व प्रक्रियांचे पालन करणार असल्याची ग्वाही देतो. कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी मी नेहमी उपलब्ध असेन. पालकांबद्दल मी केलेलं विधान असंवेदनशील आणि अनादर करणारं होतं. मी यासाठी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो', असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

'लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येताना मी पाहत आहे. रुग्ण म्हणून प्रवेश करुन लोकांनी माझ्या आईच्या दवाखान्यावर हल्ला केला. या सर्व गोष्टींची मला भीती वाटत आहे. आता पुढे काय करावे हे मला समजत नाही आहे. पण मी पळून जाणार नाही. माझा भारतातील पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे' असे म्हणत रणवीरने पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

रणवीर अलाहबादियासह पॉडकास्टर समय रैनालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहेत. पोलिसांनी रणवीरला दोनदा सन्मस पाठवला होता. मात्र त्याच्याकडून काही प्रतिक्रिया आली नसल्याचे म्हटले जात होते. अशातच रणवीर अलाहबादियाने शेअर केलेल्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं विरोधकांना भावनिक आवाहन

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोंढवा परिसरात भीषण अपघात

Baramati By-Election: संजय राऊतांच्या विधानाने सुनेत्रा पवारांचं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीही पडली बुचकळ्यात, पोटनिवडणुकीवर काय म्हणाले राऊत?

Gas Cylinder: LPG च्या नियमांमध्ये मोठा बदल, 'हा' फॉर्म भरल्यानंतरच मिळणार गॅस सिलिंडर

Konkan Tourism : कोकणातील 'या' समुद्रकिनारी घ्या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद, थंडगार वाळूत करा तुफान मज्जा

SCROLL FOR NEXT