Lalbaugcha Raja SAAM TV
मनोरंजन बातम्या

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनावरून वाद, बॉलिवूड अभिनेत्याने सर्वसामान्यांच्या रांगेतून घेतलं दर्शन, पाहा VIDEO

Randeep Hooda : बॉलिवूड अभिनेत्याने सर्वसामान्यांच्या रांगेतून उभे राहून लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. यामुळे नेटकऱ्यांकडून त्याचे कौतुक होत आहे.

Shreya Maskar

लालबागचा राज्याचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेण्यासाठी भाविक प्रत्येक वर्षी लालबागला धाव घेतात. तासनतास उभे राहून बाप्पाचे दर्शन घेतात. नुकताचं लालबाग राजाच्या मंदिराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे, ज्यात व्हीआयपींना नीट निवांत दर्शन तर सर्वसामान्यां भाविकांना मानगुटी धरून पुढे फेकलं जात आहे. असा देवाच्या घरात होणार भेद भाव पाहून नेटकरी संतापले आहेत. यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता बॉलिवूडच्या एका कलाकाराने रांगेत उभे राहून सामान्य जनतेप्रमाणे लाल बागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.

या प्रसिद्ध अभिनेत्याच नाव रणदीप हुडा (Randeep Hooda) आहे. रणदीप हुडाने आपल्या पत्नीसोबत रांगेत उभे राहून लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. रणदीपने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. त्याचा साधाभोळा स्वभाव चाहत्यांना खूप आवडतो. रणदीप हुडाने आपल्या पत्नीसोबत शुक्रवारी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी व्हिआयपी रांगेत न जाता सर्वसामान्या भक्तांच्या रांगेत जाऊन उभा राहीला आणि त्यांने दर्शन घेतले. यामुळे रणदीपने अनेकांचे मन जिंकले आहे. यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक लोक यावर कमेंट्स करून रणदीपच कौतुक करत आहे.

रणदीप हुडा आणि लिन लैशराम (Lin Laishram) यांनी इंफाळमध्ये गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली. त्यांनी मणिपुरी पद्धतीने लग्न केले. या दोघांमध्ये 10 वर्षांचं अंतर आहे. लिन ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागणार निर्बंध? जाणून घ्या

Horoscope 6 November: या राशींसाठी आजचा दिवस असेल खास, तुमची रास कोणती?

Maharashtra Live News Update: - विमानाचं लँडिंग करताना विमनाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा

Suraj Chavan Wife : बिग बॉस किंग सूरज चव्हाणची बायको कोण? नावही आहे खास

Maharashtra Politics: कोकणात मोठी राजकीय घडामोड, भाजपकडून ठाकरेसेना अन् शिंदेसेनेला धक्का; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT