Ranbir Kapoor Cuts Down Fees For Animal Instagram
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor Animal Film Fees: काय सांगता... ‘ॲनिमल’साठी रणबीर कपूरने केली ५० टक्क्यांची घट; कारण...

Chetan Bodke

Ranbir Kapoor Cuts Down Fees For Animal

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)ही नवी जोडी ‘ॲनिमल’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच अभिनेता रणबीर कपूरच्या वाढदिवशी चित्रपटाचा दमदार टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला.

चित्रपटाचे दिग्दर्शन संदिप रेड्डी वांगा या सुप्रसिद्ध दिग्दर्शकांनी केले आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या रणबीरने या चित्रपटासाठी नेमकं किती मानधन घेतलं आहे? याची सध्या चर्चा होत आहे. रणबीरने आगामी चित्रपटासाठी मानधनात २०- ३० नाही तर, तब्बल ५० टक्क्यांची घट केली आहे, यामागील नुकतंच कारण समोर आलं आहे.

पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, रणबीर कपूरने ‘ॲनिमल’ चित्रपटासाठी त्याच्या मानधनामध्ये २० ते ३० टक्के नाही तर, ५० टक्क्यांहून अधिक कपात केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी उशीर झाल्यामुळे चित्रपटाच्या खर्चात झालेल्या वाढीमुळे रणबीरने आपल्या मानधनामध्ये ५० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

रणबीर कपूर सध्याच्या घडीला एका चित्रपटासाठी तब्बल ७० कोटी रुपये इतकं मानधन आकारातो. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने ‘ॲनिमल’साठी ३० ते ३५ कोटी रुपये इतके मानधन आकारलं आहे. जर बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली तर, नफा झालेले पैसे त्याला सुद्धा मिळणार आहेत. पण नेमके रणबीरला ते पैसे किती टक्यांनी मिळणार आहेत, याची माहिती मिळालेली नाही.

दरम्यान चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, चित्रपटाची कथा वडील आणि मुलाभोवती आहे. ते दोघेही अंडरवर्ल्ड पार्श्वभूमीतून आलेले असतात. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. सोबतच बॉबी देओल आणि अनिल कपूर सुद्धा चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या १ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT