Alia Bhatt Changed Habits For Ranbir Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor News : रणबीरसाठी आलियाने लग्नानंतर बदलली स्वभावातली 'ही' गोष्ट; रणबीर म्हणाला, "तिच्यामुळे मला लहानपणीचे भीतीदायक..."

Alia Bhatt Changed Habits For Ranbir Kapoor : बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. रणबीर- आलिया हे आदर्श कपल कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं.

Chetan Bodke

बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. रणबीर- आलिया हे आदर्श कपल कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. सध्या रणबीर कपूर सोशल मीडियावर त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. नुकतंच अभिनेत्याने एका मुलाखतीत आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल खुलासा केला आहे. त्याशिवाय पत्नी आलिया भट्टच्या ही एका सवयीत अभिनेत्याने बदल केला आहे.

रणबीरने निखिल कामथच्या युट्यूब पॉडकास्टसाठी मुलाखत दिली. या मुलाखतीत रणबीरने त्याचं आणि आलियाचं वैवाहिक आयुष्य, त्यांचं प्रेमप्रकरण याबाबत बराच खुलासा केला. त्यांचं नातं सुरळीत चालू राहण्यासाठी आलियाने स्वत:मध्ये केलेल्या बदलांविषयी त्याने खुलासा केला. अभिनेत्याने मुलाखतीमध्ये सांगितले की, "लग्नानंतर आपल्याला स्वत: मध्ये खूप बदल करावा लागतो. आपल्याला आपल्या पर्सनॅलिटीमध्ये खूप बदल करावा लागतो. आलिया आणि मी एकमेकांशी आजही जुळवून घेत आहोत, जेणेकरून आम्ही एकत्र व्यवस्थित राहू शकू. आलियाला बालपणापासून मोठ्या आवाजात बोलायची सवय होती. जी तिने माझ्यासाठी बदलली."

"जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील ३० वर्षे एका विशिष्ट पद्धतीने बोलून जगता तेव्हा ते बदलणं सोप्प नसतं. पण, मी माझ्याबाजूने तिच्यात काहीच बदल केले. पण मला आशा आहे की, मी तिच्यासाठी काहीतरी करू शकेन. आलिया एक अभिनेत्री, व्यक्ती, कलाकार, मुलगी आणि बहिण म्हणून खूप खास आहे. मला तिचा अभिमान आहे. ती खरंच खूप मेहनती असून ती खूप केअरिंग करते." असं म्हणत रणबीरने आपल्या बायकोचं तोंडभरून कौतुक केले आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघंही बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे. रणबीर आणि आलियाने लग्नापूर्वी एकमेकांना ५ वर्षे डेट केले. डेट केल्यानंतर त्यांनी एप्रिल २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. रणबीर आणि आलियाची 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चांगली मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. दोघांमध्येही जवळपास १० वर्षांचं अंतर होते. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जात होते. मात्र, दोघांनी देखील एकमेकांवर असणारं प्रेम सिद्ध करून दाखवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Alliance: सात नाहीतर ६ ठिकाणी बंधूंची युती, मुंबईसह 'या' महापालिकेच्या निवडणुका उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र लढणार

Maharashtra Live News Update: जिथे गाड्या फोडल्या, तिथेच पोलिसांनी काढली मावस भावांची "वरात

Pista Benefits: रोज सकाळी ५ पिस्ता खल्ल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे

Googleवर शोधली कॉल गर्ल, नंतर हॉटेलवर बोलावून घेतलं अन्.. नेमकं घडलं काय?

Sunburn Festival: मुंबईत सनबर्न फेस्टिव्हल नकोच! सनातन संस्थेचा कडाडून विरोध

SCROLL FOR NEXT