I was the first boy in my family to pass Class 10, got 53.4%: Ranbir Kapoor Instagram/@ranbir_kapoooor
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor : १० वी पास झालेला कुटुंबातील मी पहिला सदस्य; रणबीरला दहावीत किती टक्के होते? पाहा

Shamshera Ranbir Kapoor's Upcoming Movie : करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित ‘शमशेरा’ या २२ जुलैला रिलीज होणाऱ्या चित्रपटात रणबीर मुख्य भूमिकेत आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नुकताच शमशेराच्या (Shamshera) प्रमोशनल व्हिडिओमध्ये इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर डॉली सिंगसोबत दिसला होता. रणबीरने डॉलीसमोर खुलासा केला की तो अभ्यासात चांगला नव्हता. त्याने सांगितले की, जेव्हा तो दहावीत (Standard 10th) उत्तीर्ण झाला तेव्हा कपूर कुटुंबाने एका पार्टीचे आयोजन केले होते. यासोबतच रणबीरने सांगितले की, तो त्याच्या कुटुंबातील पहिला असा मुलगा आहे, जो १० वी पास झाला होता.

हे देखील पाहा -

रणबीर अभ्यासात कच्चा होता

व्हिडिओमध्ये डॉली राजूच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. तिने रणबीरला विचारले की दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने विज्ञान किंवा गणित घेतले होते का? यावप रणबीरने सांगितले की त्याने अकाऊंट्स घेतले होते. यावर डॉलीने विचारले की, तू अभ्यासात कमकुवत होतास का? यावर रणबीरने प्रामाणिकपणे उत्तर दिलं, होय 'मी अभ्यासात खूप कच्चा होतो.'

दहावी पास झाल्यावर घरच्यांनी केलं होतं पार्टीचं आयोजन

डॉलीने रणबीरला त्याच्या दहावीच्या गुणांबद्दल विचारले, ज्यावर त्याने उत्तर दिले की "मला दहावीत 53.4% ​टक्के मिळाले ​होते. जेव्हा माझा निकाल आला तेव्हा माझे कुटुंब इतके आनंदी होते की, त्यांनी माझ्यासाठी एक मोठी पार्टी आयोजित केली होती. कारण कोणालाही आशा नव्हती की, माझ्या कुटुंबातील मुलगा दहावी पास होईल. मी माझ्या कुटुंबातील पहिला सदस्य होतो जो दहावी पास झाला आहे. यावर डॉली म्हणाली की, कपूर कुटुंब अभ्यासात कमकुवत पण अभिनयात उत्कृष्ट होते. यावर रणबीरने उत्तर दिले की, मला माहित नाही पण धन्यवाद.

रणबीर हा त्याच्या कुटुंबातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती

रणबीरने 2017 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की तो त्याच्या कुटुंबातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती आहे. तो म्हणाला, "माझा कौटुंबिक इतिहास इतका चांगला नाही. माझे वडील 8 वी ला वर्गात आणि माझे आजोबा 6 वी ला नापास झाले. मी माझ्या कुटुंबातील सर्वात शिक्षित व्यक्ती आहे." शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रणबीरने परदेशात अभिनय आणि चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले.

रणबीर कपूरचे आगामी प्रोजेक्ट्स

रणबीरच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये लव रंजनचा अनटाइटल्ड रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये तो श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. यासोबतच करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित ‘शमशेरा’ या २२ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातही रणबीर मुख्य भूमिकेत आहे. यात रणबीरसोबत वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय रणबीर आणि रश्मिका मंदान्नाचा 'अॅनिमल' हा चित्रपटही दिसणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT