Famous Director Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Director Death : प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा

Famous Director Passed Away : 'रामायण' मालिकेच्या दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन झाले आहे. आनंद सागर चोप्रा हे देखील दिग्दर्शक होते. टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

Shreya Maskar

मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वयाच्या 84 वर्षी निधन झाले.

दिग्दर्शकाच्या कुटुंबाने निधनाची माहिती शेअर केली.

मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम 'रामायण' चे निर्माते, दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद सागर चोप्रा यांचे 13 फेब्रुवारीला निधन झाले. शुक्रवारी दुपारी 4.30 वाजता मुंबईतील पवन हंस स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. आनंद रामानंद सागर चोप्रा यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबाला, मित्र मंडळींना मोठा धक्का बसला आहे. आनंद सागर चोप्रा यांनी वयाच्या 84 वर्षी अखेरचा श्वास घेतला.

आनंद सागर चोप्रा यांच्या कुटुंबाने सोशल मीडियावर पोस्टद्वारे ही दुःखद बातमी शेअर केली. सध्या कलाकार आणि चाहता वर्ग सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद सागर चोप्रा यांना श्रद्धांजली वाहत आहे. आनंद सागर चोप्रा यांच्या अंतिम निरोपाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्य दिसत आहे. पाण्याने भरलेले डोळ्यांनी ते आनंद सागर यांना अखेरचा निरोप देत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आनंद सागर हे खूप काळापासून पार्किन्सन या आजाराने ग्रस्त होते.

आनंद रामानंद सागर कोण?

2005 मध्ये रामानंद सागर यांच्या निधनानंतर, त्यांचा मुलगा आनंद सागर चोप्रा आणि त्यांच्या कुटुंबाने 'रामायण' तसेच इतर क्लासिक प्रकल्पांचे नवीन पद्धतीने पुन्हा प्रसारण सुरू ठेवले. 2020 मध्ये कोविडमुळे लॉकडाऊन झाले होते. तेव्हा 'रामायण' टेलिव्हिजनवर परत पाहायला मिळाले. त्याने लोकांच्या मनात पुन्हा नवीन स्थान निर्माण केले. मीडिया रिपोर्टनुसार, आनंद सागर यांनी 'रामायण' मालिकेच्या निर्मितीमध्ये योगदान दिले होते. 1987 मध्ये रामायण मालिका तयार होत असताना ते सह-निर्माते होते.

आनंद सागर चोप्रा यांनी 'अलिफ लैला', 'जय जय बजरंगबली' आणि 'जय शिव शंकर' सारख्या धार्मिक मालिकांची निर्मिती केली. तसेच 'आँखें' आणि 'अरमान' सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. आनंदने त्यांचे वडील रामानंद सागर यांचा वारसा जतन करण्यात आणि पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आनंद सागर यांनी स्थापन केलेल्या निर्मिती संस्थेच्या सागर आर्ट्सचा भाग म्हणून त्यांनी पौराणिक आणि भक्तीपर प्रकल्पांच्या निर्मिती, सर्जनशील देखरेख आणि व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. गेल्या काही वर्षांपासून, आनंद नवीन पिढ्यांना महाकाव्य कथांशी ओळख करून देणाऱ्या प्रकल्पांमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT