Ramayan Serial Star  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ram Mandir Pran Pratistha: अयोध्येमध्ये पोहचले रामायणातील राम-लक्ष्मण आणि सीता, आनंद व्यक्त करत म्हणाले...

Priya More

Ramayan Serial:

अयोध्येमध्ये (Aayodhya) बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या ऐतिहासिक क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाचे लक्ष राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) सोहळ्याकडे लागले आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या सोहळ्याला देशभरातील राजकीय, सामाजिक आणि मनोरंजनसृष्टीतील मान्यवरांना बोलावण्यात आले आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यासाठी 'रामायण'मालिकेमध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल, लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी आणि माता सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया अयोध्येमध्ये पोहचले आहेत. अयोध्येमध्ये पोहचताच त्यांनी आनंद व्यक्त केला.

रामानंद सागर यांच्या 'रामायण' या पौराणिक मालिकेत भगवान श्री रामची भूमिका साकारून अरुण गोविल यांनी प्रत्येक घराघरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अनेक वर्षांनंतरही प्रेक्षक अरुण गोविल यांना त्याच पात्रात पाहतात आणि त्यांचा आदर करतात. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अरुण गोविल अयोध्येत पोहोचले तेव्हा लोकांनी त्यांच्या पायाला स्पर्श करून स्वागत केले. अरुण गोविल यांच्या अयोध्येतील स्वागताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अरुण गोविल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अरुण गोविल फ्लाइटमध्ये बसलेले दिसत असून त्यांच्याभोवती जय श्री रामच्या घोषणा दिल्या जात आहेत. व्हिडीओ शेअर करताना अरुण गोविल यांनी लिहिले की, 'राम नाम कर अमित प्रभावा, संत पुरान उपनिषद गावा. आज अयोध्येतील महर्षि वाल्मिकी विमानतळावर विमान उतरल्यानंतरची काही दृश्ये...हे एक अतिशय सुंदर विमानतळ आहे. जय श्री राम.'

अरुण गोविल अयोध्या विमानतळावर पोहोचताच लोकांनी रामायण मालिकेतील रामाचे अतिशय सुंदर पद्धतीने स्वागत केले. काहींनी अरुण गोविल यांच्या पायाला स्पर्श केला तर कुणी येऊन सेल्फी काढला. तसेच अरुण गोविल यांचे जय श्री राम म्हणत स्वागत केले. अरुण गोविल यांनाही फुलांचा हार आणि अंगवस्त्र देऊन सन्मानित करण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अरुण गोविल यांचे अयोध्येत आगमन आणि त्यांच्या सुंदर स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याला रामायणातील राम-लक्ष्मण आणि सीता हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सद्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT