Ram Setu Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ram Setu Twitter Review: अक्षय कुमारच्या 'राम सेतू'ला विलक्षण प्रतिक्रिया; प्रेक्षकांची चित्रपटांची उत्सुकता शिगेला

अक्षय कुमारचा 'राम सेतू' हा चित्रपट रिलीज होताच चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ram Setu Twitter Review: बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचे तीन चित्रपट यावर्षी फ्लॉप ठरले आहेत. याच कारणामुळे त्याचा 'राम सेतू' (Ram Setu) हा चित्रपट चाहत्यांना आवडतो की नाही हे बॉलिवूड आणि अक्षयसाठी देखील महत्त्वाचे आहे. (Bollywood Movie)

अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांचा 'राम सेतू' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Bollywood Actor) या चित्रपटाच्या नावावरून स्पष्ट होते की, हा चित्रपट प्रभू राम यांच्यावर चित्रीत करण्यात आला आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची कथा 'राम सेतू'च्या शोधात अक्षय कुमार आणि त्याची टीम निघालेली आहे. अक्षय पुरातत्व विभागातील शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसत आहे. (Bollywood Actress)

केवळ निर्मात्यांनाच नाही तर, चाहत्यांनाही या चित्रपटाकडून खूप आशा आहेत कारण या वर्षात अक्षय कुमारचे तीन फ्लॉप चित्रपट झाले होते. ज्यात 'बच्चन पांडे', 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'रक्षाबंधन' असून चौथा चित्रपट 'कठपुतली' ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. आता अक्षयचा हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

Raam Setu Review

सोशल मीडिया युजर्स चित्रपटाबद्दल म्हणतात, अक्षय कुमारचा 'राम सेतू' हा चित्रपट रिलीज होताच चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. इतकेच नाही तर अनेकांनी या चित्रपटाला पाचपैकी चार स्टार दिले आहेत. चित्रपटाचे कौतुक करताना एका यूजर्स म्हणतो, 'अक्षय कुमारचा चित्रपट धाडस, भावना, संघर्ष, अॅक्शन, व्हीएफएक्सवर आधारित आहे. रामसेतू हा अक्षय कुमारचा सध्याचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे... क्लायमॅक्सला सलाम... उत्कृष्ट दिग्दर्शन..'

चित्रपटाविषयी यूजर्स म्हणतात, 'इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट रामसेतू.', एका यूजर्सने चित्रपटाच्या इंटरव्हलच्या आधीच्या भागाचे कौतुक करत म्हणतो, 'इंटरव्हलपर्यंत सर्व काही ठीक चालले आहे. चित्रपट विषयापासून विचलित होत नाही. तर आणखी एक यूजर्स म्हणतो, 'राम सेतू फर्स्ट हाफ.... विलक्षण... चांगली संकल्पना.' अशा प्रतिक्रिया सध्या चित्रपटासाठी येत आहे.

काय आहे चित्रपटाची कथा

रामायणानुसार, श्रीलंकेला जाण्यासाठी भगवान श्रीरामांच्या सैन्याने 'राम सेतू' बांधला होता आणि 'राम सेतू' चित्रपटाची कथा पुरातत्व विभागातील शास्त्रज्ञाची आहे. अक्षय कुमार पुरातत्व विभागातील शास्त्रज्ञाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, सरकारने न्यायालयाकडे राम सेतू पाडण्याची मागणी केली आहे, त्यानंतरच पुरातत्व विभागातील शास्त्रज्ञाला राम सेतू आहे की नाही यावर संशोधन करण्यासाठी पाठवले जाते. आता या चित्रपटातून इतिहासाची पाने कशी छेडली गेली? हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

SCROLL FOR NEXT