Ram Charan - Upasana Kamineni Instagram @upasanakaminenikonidela
मनोरंजन बातम्या

Ram Charan Wife Upasana Emotional Video : लेकीच्या जन्माआधी उपासना Emotional; मैत्रिणीने शेअर केला भावुक व्हिडिओ

Ram Charan - Upasana Kamineni : उपासनाचा एक नवीन व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

Pooja Dange

Upasana Kamineni Video : राम चरण आणि उपासना यांना मुलगी झाली आहे. दोघांनी आई-वडील झाल्याचा खूप आनंद झाला आहे. 20 जून 2023 रोजी, उपासनाने हैदराबादमधील जुबली हिल्स येथील अपोलो रुग्णालयात मुलीला जन्म दिला.

या दोघांचे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दरम्यान उपासनाचा एक नवीन व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर तिला डिलिव्हरी रूममध्ये नेताना दिसत आहेत. (Latest Entertainment News)

23 जून रोजी राम चरण आणि उपासना त्यांच्या मुलीला हॉस्पिटलमधून घेऊन घरी देखील नेले. घरी या छोट्या परीचे मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले. मुलीच्या जन्माच्या काही तासांपूर्वी उपासनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यादरम्यान ती खूप आनंदी दिसत आहे. तिची मैत्रिण मेहा पटेलची इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करताना उपासना म्हणाली: “5 दिवसांपूर्वी. आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण. अमाप प्रेमाने भरलेला."

व्हिडिओमध्ये डॉक्टर, नर्स आणि कुटुंबातील काही सदस्य उपासनासोबत या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हे सगळे तिच्यासोबत लेबर रूमच्या दिशेने जाताना दिसत आहेत. उपासनाच आनंद पाहून तिची मैत्रीण मेह पटेल म्हणते की, “अपसी, तुझे डोळे क्वचितच पाणावतात. तर उपासना म्हणते: "तुम्ही लोक माझा आनंद आहात."

आई झाल्यानंतर चार दिवसांनी उपासनाने इन्स्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांचा कुत्रा अभिनेता राम चरणच्या मांडीवर दिसत आहे. तर उपासनाच्या मांडीवर त्यांची चिमुकली आहे.

या दोघांच्यामागे गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे फुगे आणि फुले दिसत आहेत. त्यावर वेलकम होम बेबी असे लिहिले आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये उपासनाने लिहिले की, आमच्या चिमुरडीचा स्वागत पाहून भारावून गेलो. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी सर्वात मोठी बातमी! राज्यातील तब्बल ५० लाख महिलांचा लाभ कायमचा बंद, कारणही आले समोर

Bhimashankar : पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भिमाशंकरमध्ये शिवलिंगावर दुग्धाभिषेक आणि महाआरती | VIDEO

Shravan Somwar 2025: पहिल्याच श्रावणी सोमवारी बनलेत 4 दुर्मिळ योग; 3 राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

Office Snacks Recipe : ऑफिसमधल्या छोट्या भुकेसाठी हेल्दी स्नॅक्स, आताच ट्राय करा 'हा' पदार्थ

घराच्या कोपऱ्यात लपलेला तब्बल १२ फूट अजगर; व्हिडिओ पाहून शहारे येतील

SCROLL FOR NEXT