Ram Charan Share Big News In His Life upasanakaminenikonidela
मनोरंजन बातम्या

Ram Charan: दाक्षिणात्य सुपरस्टारच्या घरी १० वर्षांनी गुड न्यूज; लवकरच दुुडुदुडु धावणार पावलं...

लग्नाच्या 10 वर्षांनंतर राम चरण बाबा होणार आहे.

Pooja Dange

Ram Charan Shares Good News: अभिनेता राम चरण तेलगू चित्रपटातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. तो त्याच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत असतो. पण सध्या तो चर्चेत येण्याचे कारण खूप खास आहे. राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला गर्भवती आहे. राम चरण यांनी याबाबतची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली आहे. लग्नाच्या 10 वर्षांनंतर राम चरण बाबा होणार आहे. तेलुगू सुपरस्टारच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

राम चरणसाठी 2023 हे वर्ष खूप खास असणार आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये हनुमानचा फोटो आहे. पोस्टमध्ये राम चरणने लिहिले आहे- 'श्री हनुमानाच्या कृपेने, आम्हाला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की राम चरण आणि उपासना त्यांच्या जीवनात पहिल्या बाळाची चाहूल लागली आहे. प्रेम आणि कृतज्ञता सुरेखा आणि चिरंजीवी कोनिडेला, शोभना आणि अनिल कामिनेनी. (Social Media)

जुलैमध्ये राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या लग्नाचा 10 वा वाढदिवस इटलीमध्ये साजरा केला. राम चरण आणि उपासना कॉलेजमध्ये एकमेकांना भेटले. एक वर्ष डेट केल्यानंतर 14 जून 2012 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. जुलैमध्ये उपासना प्रेग्नंट असल्याची खूप चर्चा झाली होती, पण उपासना म्हणाली की तिला सध्या मूल नको आहे आणि लोकांनी तिच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. (Actor)

राम चरण आणि उपासना यांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे आहेत. राम चरण खूप शांत आहे, तर उपासना खूप मोकळ्या मनाची आहे. राम चरण शेवटचा सुपरहिट चित्रपट 'RRR' मध्ये दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT