Umesh Kamat Birthday Special: प्रिया बापटने नवऱ्याला दिले गोड 'सरप्राईज', 'माय लाईफ' म्हणत उमेश कामतची केली स्तुती

उमेशच्या वाढदिवसानिमित्त प्रियाने व्हिडिओ शेअर केला आहे.
On Umesh Kamat Birthday Priya Bapat Gave Him Special Gift
On Umesh Kamat Birthday Priya Bapat Gave Him Special GiftInstagram @umesh.kamat and @priyabapat

Priya Bapat-Umesh Kamat: प्रिया बापट आणि उमेश कामत महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. प्रिया आणि उमेश नेहमीच एकमेकांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. प्रिया बापटने दोघांचा असाच एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आज उमेश कामत याचा वाढदिवस आहे. उमेशच्या वाढदिवसानिमित्त प्रियाने व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघ्यांच्या आयुष्यातील गोड आणि विनोदी क्षण तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. या व्हिडिओमध्ये उमेश त्याच्या वाढदिवसा साजरा करताना देखील दिसत आहे. प्रियाने या व्हिडिओला कॅप्शन सुद्धा दिले आहे. 'हॅपी बर्थडे माय लाईफ' आणि हार्ट ईमोजी ठेवत तिने व्हिडिओ शेअर केला आहे. (Birthday)

On Umesh Kamat Birthday Priya Bapat Gave Him Special Gift
Besharam Rang: शाहरूख-दीपिकाचे 'बेशरम रंग' गाणं इतकं का व्हायरल होतंय? 4 तासांत केली 'ही' कमाल

प्रिया बापटने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर प्रेक्षक लाईकचा वर्षाव करत आहेत. तसेच या पोस्टच्या माध्यमातून प्रिया आणि उमेशचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देत आहेत. उमेश कामत आज त्याचा ४४ वाढदिवस साजरा करत आहे. (Celebrity)

उमेश आणि प्रिया यांची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०११ मध्ये हे जोडपे विवाहबंधनात अडले. ही जोडी अनेकांची फेवरेट आहे.

उमेश आणि प्रिया नेहमीच सोशल मीडियावर ट्रेंड फॉलो करताना दिसतात. त्यांच्या विनोदी अंदाज नेहमीच चाहते डोक्यावर घेतात. दोघांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर उमेश फु बाई फु या झी मराठीवरील शोचे परीक्षण करत होता. परंतु काही कारणास्तव हा शो बंद झाला आहे. प्रिया चक्की या चित्रपटात दिसली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com