Ram Charan: वैश्विक कोरोना महामारीमध्ये सर्वच उद्योगधंदे बंद पडले, तसा फटका मनोरंजन क्षेत्रालाही बसला. प्रेक्षकवर्ग सध्या ओटीटी माध्यमामुळे चित्रपटगृहात साधे फिरकतही नाही. त्यातल्या त्यात हिंदी चित्रपटसृष्टीला तर बॉयकॉट ट्रेंडचा तर चांगलाच फटका लागला होता.
बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांनी म्हणावी इतकी कमाई केली नाहीत. पण यासर्वांना दाक्षिणात्य चित्रपट चांगलेच पुरुन उरले आहेत. सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'RRR' हा चित्रपट अजुनही उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
चित्रपट प्रदर्शित होऊन गेले ८ महिने झाले असले तरी चित्रपट उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. आजही हा चित्रपट अनेक रेकॉर्ड्स मोडित काढत असून जगभरात चित्रपटाचा ठसा पाडला आहे.
दरम्यान, चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राम चरणने 'RRR'च्या सुरुवातीच्या दृश्यावर मोठा खुलासा केला आहे. एवढेच नाही तर या राम चरणने यावेळी बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचीही खिल्ली उडवली आहे.
रामचरणने 'लीडरशिप समिट २०२२' च्या या कार्यक्रमात चांगलाच टोमणा मारला आहे. या कार्यक्रमात अक्षय कुमार आणि रामचरण हे दोघेही सहभागी झाले होते. अक्षय कुमार आपल्या धडाकेबाज आणि सुपरहिट चित्रपटासाठी ओळखला जातो. पण २०२२ हे वर्ष त्यासाठी अपवाद ठरले आहे. अक्षयचे यावर्षात जवळपास बरेच चित्रपट प्रदर्शित झाले. ते सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटलेले दिसून येत आहे.
सध्या अक्षयच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा सध्या फारसा प्रतिसाद मिळत नाही. अक्षयचे वर्षभरात 4 ते 5 चित्रपट सहज प्रदर्शित होतात. अक्षयच्या एका चित्रपटाची शूटिंग जेमतेम एका महिन्यात पूर्ण करतो.
पण आता हेच त्याच्या चित्रपटाच्या अपयशाचे प्रमुख कारण मानले जात आहे. आता याच मुद्द्यावरून राम चरणने अक्षयला टोमणा मारला आहे. या कार्यक्रमात रामचरणला त्याचा सर्वाधिक चर्चेत असलेला 'RRR'चित्रपटाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते.
त्यावेळी त्याने उत्तर दिले की, "आमच्यासोबत 'RRR'च्या सेटवर दररोज हजारोंच्या संख्येने लोकं उपस्थित राहायचे. चित्रपटातील सुरुवातीच्या एका सीनच्या शूटिंगसाठी सुमारे 35 दिवस लागले. एवढ्या दिवसात तर अक्षय कुमार एका संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करतो.'' अक्षयचा सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज'चे शूटिंग अवघ्या ४२ दिवसातच पूर्ण केले होते. पण तरीही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर म्हणावी इतकी जादू दाखवू शकला नव्हता.
त्यावेळी त्याने उत्तर दिले की, "आमच्यासोबत 'RRR'च्या सेटवर दररोज हजारोंच्या संख्येने लोकं उपस्थित राहायचे. चित्रपटातील सुरुवातीच्या एका सीनच्या शूटिंगसाठी सुमारे 35 दिवस लागले. एवढ्या दिवसात तर अक्षय कुमार एका संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करतो.''
अक्षयचा सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज'चे शूटिंग अवघ्या ४२ दिवसातच पूर्ण केले होते. पण तरीही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर म्हणावी इतकी जादू दाखवू शकला नव्हता.
सतत बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप होण्यामागचे कारण अक्षय सध्या शोधत आहे. त्याचमुळे त्याने 'हेरा फेरी 3'साठी करण्यास नकार दिला आहे. 'हेरा फेरी 3' चित्रपटाचं स्क्रिप्ट पटलं नसल्याने आपण त्याला नकार दिला' असं अक्षय म्हणाला होता. आता या चित्रपटात अक्षयच्या जागी कार्तिक आर्यनला रिप्लेस करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.