Ram Charan And Kiara Adwani New Film Instagram
मनोरंजन बातम्या

RC 15: कियाराची पहिल्यांदाच साउथ चित्रपटात एन्ट्री ! रामचरणसोबत झळकणार

कियारा आणि रामचरणने आपल्या आगामी पॉलिटिकल थ्रिलर शूटिंगची सुरुवात केली आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘RC 15’ आहे.

Chetan Bodke

Ram Charan And Kiara Adwani New Film: दाक्षिणात्य चित्रपट रामचरणचा आज ३८ वा वाढदिवस. त्याने आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. रामचरणसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील दिसणार आहे. कियारा आणि रामचरणने आपल्या आगामी पॉलिटिकल थ्रिलर शूटिंगची सुरुवात केली आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘RC 15’ आहे.

आपल्या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर रामचरणने अखेर चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केली आहे. या तेलुगू स्टारच्या बहूप्रतिक्षित चित्रपटाचे शीर्षक ‘गेम चेंजर’ असे ठेवण्यात आले. रामचरणसोबतच कियाराने देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाचा शीर्षक व्हिडीओ शेअर केला आहे.

आपल्या ट्विटरवर चित्रपटाचे शीर्षक शेअर करत राम चरणने व्हिडिओची लिंक शेअर करत लिहिले, “हा गेम चेंजर आहे!!!!” राम चरण आणि कियारा अडवाणी सोबत या गेम चेंजर चित्रपटात अंजली, समुथिराकणी, एसजे सूर्या, श्रीकांत, सुनील या कलाकारांचाही समावेश आहे. एस थमन या चित्रपटासाठी गाणी आणि पार्श्वसंगीत तयार करत असून हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

एस शंकर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अॅक्शन ड्रामा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्सच्या बॅनरखाली दिल राजू आणि शिरीष गरू या प्रकल्पाची सहनिर्मिती करत आहेत. हा चित्रपट तेलगू, तमिळ आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘गेम चेंजर’ मधील कलाकारांनी आणि चित्रपटाच्या टीमने रामला त्याच्या 38 व्या वाढदिवसापूर्वी शनिवारी पार्टी देऊन आश्चर्यचकित केले. प्री-बर्थडे पार्टीमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. सेटवर जाताना एका फोटोमध्ये रामवर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता. एस शंकर, अभिनेता-कोरियोग्राफर प्रभू देवा, कियारा आणि इतरांनी या उत्सवात भाग घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात रामचरण दोन भूमिकांमध्ये दिसणार आहे. कियारा अडवाणी, अंजली, एसजे सूर्या, जयराम, नवीन चंद्र, नस्सर, श्रीकांत, सुनील आणि समुथिराकन यांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘गेम चेंजर’ या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT