Rakhi Sawant Viral Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Viral Video: राखीच्या मागची साडेसाती संपेना, आईच्या निधनानंतर मिळाला अजून एक मोठा धक्का

राखीचे लग्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

Pooja Dange

Rakhi Sawant Marriage Is In Danger: राखी सावंत तिच्या आईच्या निधनाने खूपच खचली आहे. दरम्यान पुन्हा एकदा राखीचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राखीला रडायला काय झालं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आता राखीचे वैवाहिक जीवन संकटात आहे. तिचे लग्न तुटणार असल्याचे ती सांगत आहे.

'बिग बॉस मराठी ४'मधून बाहेर आल्यानंतर राखीने आदिलसोबत लग्न केल्याचे सांगितले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. आदिल लग्न स्वीकारत नसल्याने राखीने त्यांचे लग्न सर्वांसमोर आणले होते. राखीचे लग्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

राखीचा व्हिडिओ एका पापाराझीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी म्हणत आहे की, 'माझे लग्न धोक्यात आहे. मी खूप अस्वस्थ आहे. देवा तू मला मारत का नाहीस? मला माझे लग्न वाचवायचे आहे. लग्न काही साडी गोष्ट नाही. माझ्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करून कोणाला काय मिळतं. व्हिडीओमध्ये राखी सावंत हात जोडून रडत म्हणते, 'अहो माझ्यावरील अत्याचार थांबवा.' तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी कमेंट देखील करत आहेत.

राखीच्या व्हिडिओवर एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, 'लग्न का केले, नाटकी करायला.' दुसर्‍याने लिहिले आहे, 'या बाईचे काहीही होऊ शकत नाही.' तर अनेकांनी कमेंटमध्ये लिहिले आहे की, मीडियासमोर रडून तमाशा करायचा तिला कंटाळा येत नाही का? याशिवाय काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर राखी सावंतला कमेंट करून ट्रोल केले आहे.

राखीने तिच्या आणि आदिलच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले होते. राखीच्या लग्नावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. त्यानंतर राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तर राखीचा नवरा आदिल या लग्नासाठी तयार नव्हता. खुओ ड्रम झाल्यानंतर आदिल दुर्रानीनेही सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत लग्न स्वीकारले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT