Rakhi Sawant On Hindu Religion Saam TV
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Performs Umrah: हिंदू धर्म वाईट होता का? 'मक्का'हून परतलेल्या राखी सावंतने दिलेल्या उत्तरावर फॅन्सचा संताप

Rakhi Sawant Return From Mecca: राखी सावंत उमराह करून परतली तेव्हा तिचे मित्रमंडळी आणि फॅन्स तिच्या स्वागतासाठी एअरपोर्टवर हजर होते.

Pooja Dange

Rakhi Sawant On Religion:

अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंतचा नवरा आदिल तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने राखीवर अनेक आरोप केले. त्यानंतर राखी उमराह करण्यासाठी मक्का येथे गेली. राखी भारतात परतली आहे.

भारत परतल्यानंतर राखीला एअरपोर्टवर पापाराझींनी घेरलं. तेव्हा राखीला पापाराझींनी अनेक प्रश्न विचारले. एका पत्रकाराने राखीला हिंदू धर्मात काय वाईट आहे, असे विचारले. तेव्हा राखीने जे उत्तर दिले त्यामुळे नेटकरी तिच्यावर संतापले आहेत.

राखी सावंत उमराह करून परतली तेव्हा तिचे मित्रमंडळी आणि फॅन्स तिच्या स्वागतासाठी एअरपोर्टवर हजर होते. राखी येताच मित्रमंडळी आणि फॅन्सनी तिच्या गळ्यात फुलांचे हार घालून तिचे स्वागत केले. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर च्यारलं होत आहे.

राखी सावंतचे उत्तर

राखी स्वतः जेव्हा एअरपोर्टवर स्पॉट झाली. पापाराझींनी तिला राखी अशी हाक मारली असता तिने 'मी राखी नसून फातिमा आहे मला फातिमा म्हणा' असे सांगितले. त्यानंतर एका पत्रकाराने राखीला प्रश्न विचारला की, 'हिंदी धर्मात काय वाईट होते ज्यामुळे तू इस्लाम स्वीकारल्यास?

याचे उत्तर देताना राखी म्हणाली, हिंदी धर्मात काही वाईट नाही. मी अदिलशी निकाह केला आहे. मला निकाह करून एक वर्ष झाला आहे. जेवहा तुम्ही निकाह करता तेव्हा तुंही इस्लाम काबुल करता. त्यामुळे तुम्हाला हे सर्व करावं लागत. मी नशीबवान आहे की मला मक्का मदिना येथून बुलावा आला.' (Latest Entertainment News)

राखीच्या या उत्तराने नेटकऱ्यांमध्ये हिंदू-मुस्लिम असा वाद सुरू झाला आहे. काही नेटकरी राखी कोणत्याच धर्माची होऊ शकत नाही असे म्हणत आहेत. तसेच या व्हिडीओवर एका नेटकाऱ्याने कमेंट केली आहे, 'निकाह केल्यानंतर मुस्लिम झाली आता तलाख झाल्यानंतर पुन्हा इसाई (ख्रिश्चन) होशील.' तर दुसऱ्याने म्हटले आहे, 'ती कधीच हिंदू नव्हती, ती इसाई (ख्रिश्चन) होती.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Treatment: गूड न्यूज! कॅन्सर कायमचा नष्ट होणार; तज्ज्ञांना मिळालं सोल्युशन

Maharashtra Live News Update: राज्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

Crime News : दुचाकीवरून घेऊन गेला, वाटेत कॅनॉलमध्ये बुडवून मारलं; जन्मदात्या बापाने घेतला ७ वर्षाच्या मुलीचा जीव

Sunetra Pawar Oath Ceremony : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहणार? शरद पवारांचं मोठं विधान

Baramati Name History: 'बारामती' हे नाव कसं पडलं? खरा इतिहास काय आहे?

SCROLL FOR NEXT