salman khan and hania amir Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salaman Khan: सलमान खान करणार पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत लग्न? ड्रमा क्वीन जुळवणार नवी जोडी

Salaman Khan: आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतने आता पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला आपली वहिनी म्हणून घोषित केले आहे. तिला सलमान खान आणि हानिया आमिरची जोडी बनवायची आहे.

Shruti Vilas Kadam

Salaman Khan: सध्या बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या पुढच्या 'सिकंदर' चित्रपटच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे आणि आता निर्माते त्याच्या पोस्ट प्रॉडक्शनवर काम करत आहेत. दरम्यान, ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंतने म्हटले आहे की तिने सलमान खानसाठी एक मुलगी आणि स्वतःसाठी एक वाहिनी निवडली आहे. अलिकडेच राखी सावंतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडीओमध्ये ती सलमान आणि हानियाची जोडी बनवताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये, राखी सावंतने भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट संघांच्या जर्सी परिधान केलेली आहे. राखी म्हणते, “सलमान भाई, मी माझी वाहिनी म्हणून हानियाला निवडले आहे. सलमान माझा भाऊ आहे आणि हानिया माझी वहिनी आहे, जी पाकिस्तानची आहे. राखी पुढे म्हणते, “हानियाने बॉलिवूडमध्ये येऊन सलमान खानसोबत काम करावे. देवाचे आभार, बॉलिवूडने हे ऐकले आहे... माझी लाडकी बहीण हानिया, मी तुला खूप प्रेम करते.

हानिया सलमानची नायिका बनेल का?

यावेळी राखीने हानियाच्या दिलजीत दोसांझ आणि हनी सिंगसोबतच्या सहकार्याबद्दल सांगितले. ती पुढे म्हणते, “आता तो दिवस दूर नाही जेव्हा तू सलमान खानसोबत नायिका म्हणून येशील. आणि मी सलमान खानशी बोलत आहे. तो दुबईला आला आहे आणि मी त्याला भेटणार आहे. मी तुझ्याबद्दल बोलेन." मुर्तजा व्ह्यूज इंस्टा चॅनलशी बोलताना राखीने सांगितले की, तिला हानियाने बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य नायिका म्हणून काम करावे असे वाटते.

राखी हानियाला तिची वहिनी म्हणते.

राखी म्हणाली की ज्याप्रमाणे बजरंगी भाईजान हा चित्रपट भारत-पाकिस्तानवर होता, त्याचप्रमाणे भारत आणि पाकिस्तान यांच्यातही अशीच सुंदर प्रेमकथा बनवली पाहिजे. इथून सलमान खान आणि तिथून माझी वहिनी हानिया, म्हणजे चित्रपटांमध्ये. राखी पुढे म्हणते, सलमान भाई तू फक्त हानियाशीच लग्न करशील... जर सोमी अली तुझी प्रेयसी असू शकते तर हानिया तुझी पत्नी का नाही होऊ शकत?"

राखी सावंतने गेल्या काही दिवसांत हानिया आमिरबद्दल अनेक विधाने केली आहेत. काही दिवसांपूर्वी तिने पाकिस्तानात लग्न केल्याचा दावाही केला होता. आता तिने सलमान आणि हानियाची जोडी बनवण्याबद्दल बोलली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस वंचित बहुजन आघाडीशी युती करणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकून ट्रकचा चक्काचूर, केबिनमध्ये अडकला ड्रायव्हरचा मृतदेह

Tata Sierra: टाटा सिएरासाठी विक्रमी मागणी, पहिल्या दिवशी ७०,०००पेक्षा जास्त ऑर्डर्स, वाचा खास वैशिष्ट्ये

Dhananjay Munde: मंत्रीपदासाठी फिल्डिंग; इकडे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, तिकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत वाद उफाळणार; चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT