Rakhi Sawant Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: दीपिका आई झाली अन् राखीचा आनंद गगनात मावेना, दुबईत खरेदी केली खेळणी; Video पाहा

Ranveer And Deepika Baby: रणवीर आणि दीपिकाला बाळ झाल्यानंतर अभिनेत्री राखी सावंतला आनंद झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध कपल अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण नुकतंच आई- बाबा झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटीसह चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच आता अभिनेत्री 'ड्रामा क्वीन' राखी सांवतने रणवीर आणि दीपिकाला अभिनंदन केले आहे. राखीने दुबईच्या मॉलमध्ये बाळासाठी खेळणी घेतली आहेत.

राखी सांवतने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये राखी मॉलमध्ये गेल्याचं दिसतय. राखीने, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणला प्लाइंग किस देत "मी मावशी झाल्याचं म्हटलं आहे. दीपिका तुला आठवतंय का? आपण एकत्र डान्स केला होता. एकत्र करिअरला सुरूवात केली. तू मोठी स्टार झालीस, बायको झाली आणि आता आई झाली आहेस ओ माय गॉड..."

मावशी झाल्याबद्दल राखीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. राखीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपिका आणि रणवीरला शुभेच्छा दिल्या आहेत. राखीने दीपिका- रणवीरच्या बाळासाठी खेळणी देखील घेतली आहेत. सोशल मीडियावर राखीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

मागच्या वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपिकाने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. सप्टेंबर महिन्यात दीपिकाच्या घरी नव्या पाहुण्याचे स्वागत होणार असल्याचे तिनं सांगितलं होतं. यानंतर दीपिका आणि रणवीर मॅटर्निटी लिव्हवर होते. आता बाळाला जन्म दिल्यानंतर पाच महिन्यांनी दीपिका तिच्या कामाला सुरूवात करणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT