Rakhi Sawant Live In Relationship: बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत सध्या प्रचंड चर्चेत आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि बोल्ड लूकमुळे ती नेहमी चर्चेत असते. राखीला (Rakhi Sawant) पुन्हा एकदा तीच नवं प्रेम म्हणजेच तिचा नवीन बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीमुळे चर्चेत आली आहे. चर्चा होती की राखी आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल हे लिव्ह इनमध्ये (live In Relationship) राहत आहेत. या चर्चांवर राखीने मौन तोडलं आहे.
नुकतीच दुबईहून (Dubai) परतलेल्या या अभिनेत्रीने सांगितले आहे की, हो आम्ही सोबत आहोत आणि आम्ही एकत्र राहत आहोत. ती आता तिच्या प्रियकरासोबत मुंबईत (Mumbai) राहणार आहे. आदिलचा मुंबईत कारचा व्यवसाय आहे आणि आदिल लवकरच मुंबईला शिफ्ट होऊ शकतो. तो या शहरात आणखी बिझनेस वाढवण्याचा विचार करत असल्याचेही तीने या मुलाखतीदरम्यान सांगितले. मी आणि आदिल मुंबईत डान्स अकादमी सुरू करण्याचा विचार करत आहोत, असे ती म्हणाली.
दरम्यान, नुकताच राखी आणि आदिलचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राखी सावंत आणि आदिल दुर्राणीचा हा लेटेस्ट व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये, ती ब्लॅक सिक्विन डीप नेक अटायरमध्ये खूप बोल्ड दिसत आहे. त्याचबरोबर आदिलचा जेंटलमॅनचा लूक पाहायला मिळाला आहे. राखी आदिलसोबत डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.