Chandra Grahan 2025: आज लागणार वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर

Lunar eclipse effects on zodiac signs: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहणाचा मानवी जीवनावर आणि राशींवर शुभ-अशुभ प्रभाव पडतो. आजच्या या ग्रहणामुळे काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होईल, तर काही राशींसाठी हा काळ अडचणी आणि संकटे घेऊन येईल.
Chandra Grahan 2025
Chandra Grahan 2025saam tv
Published On

हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. शास्त्रांनुसार धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाला अशुभ मानलं जातं. चंद्रग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना असून धार्मिक श्रद्धेनुसार या काळात कोणतेही शुभ वा मंगल कार्य केले जात नाही. लवकरच वर्षातील दुसरे चंद्रग्रहण लागणार असून यावेळी ते भारतातही दिसणार आहे.

या ग्रहणाचा थेट परिणाम मानवी जीवनावर तसंच सर्व राशींवर होणार आहे. या ग्रहणातून काहींना शुभ तर काहींना अशुभ असं दोन्ही परिणाम भोगावे लागू शकतात. काही राशींसाठी मात्र हे ग्रहण अत्यंत प्रतिकूल ठरणार आहे.

Chandra Grahan 2025
Shani-Budh Kendra Yog: न्यायदेवता शनी बनवणार शक्तीशाली योग; 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

चंद्रग्रहणाची वेळ

वर्षातील दुसरं चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रविवार म्हणजेच रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी सुरू होईल आणि ८ सप्टेंबर पहाटे १ वाजून २६ मिनिटांनी समाप्त होणार आहे. ज्योतिषानुसार हे चंद्रग्रहण ‘ब्लड मून’ स्वरूपात दिसणार आहे. या वेळी चंद्र पूर्णपणे लालसर रंगाचा भासेल.

कर्क रास

कर्क राशीचा अधिपती ग्रह चंद्र असल्यामुळे या ग्रहणाचा प्रतिकूल परिणाम थेट कर्क राशीवर होणार आहे. ग्रहणकाळात चंद्राची शक्ती कमी होते. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी मानसिक स्थिरता राखणे गरजेचे आहे. आरोग्य आणि नातेसंबंध याकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल.

Chandra Grahan 2025
Shani-Budh Kendra Yog: न्यायदेवता शनी बनवणार शक्तीशाली योग; 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

कन्या रास

या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण कन्या राशीच्या सहाव्या भावात होतंय. त्यामुळे कामकाजावर नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. या काळात कोणत्याही मोठ्या कार्याची सुरुवात टाळावी. धन, नाती आणि आरोग्य या सर्व बाबतीत हे दिवस प्रतिकूल ठरू शकतात.

Chandra Grahan 2025
Budhaditya Rajyog: 12 महिन्यांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल बुधादित्य योग; 'या' राशींना मिळू शकणार पद-प्रतिष्ठा

कुंभ रास

या वेळी होणारं चंद्रग्रहण थेट कुंभ राशीतच होत असल्याने या राशीच्या लोकांनी अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे. ग्रहणाच्या छायेमुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे नातेसंबंधांमध्ये मतभेद किंवा वादाचं वातावरण होण्याची शक्यता आहे.

Chandra Grahan 2025
Malavya Rajyog: १२ महिन्यांनंतर शुक्र बनवणार पॉवरफुल योग; कमाईसोबत 'या' राशींना होणार धनलाभ

मीन रास

मीन राशीच्या द्वादश भावात हे ग्रहण होत असल्यामुळे त्रासदायक परिस्थिती उद्भवू शकते. हा भाव हानीशी संबंधित असल्याने अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि नातेसंबंध यांच्या बाबतीतही सावध राहणे अत्यावश्यक ठरेल.

Chandra Grahan 2025
Malavya Rajyog: 12 महिन्यांनी बनणार मालव्य राजयोग; 'या' ३ राशींवर शुक्राची राहणार कृपा, धनलाभ होणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com