राखी सावंतला मिळालं नवं प्रेम, प्रियकराने ने भेट दिली BMW, म्हणाली...

एंटरटेनमेंट क्वीन राखी सांवतच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली आहे. होय ! राखी सावंतला नवीन प्रेम मिळालेलं आहे आणि राखी तिच्या नवीन जोडीदारासोबात खूप खुश आहे.
Rakhi Sawant
Rakhi SawantSaam Tv
Published On

मुंबई: एंटरटेनमेंट क्वीन राखी सांवतच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली आहे. होय ! राखी सावंतला नवीन प्रेम मिळालेलं आहे आणि राखी तिच्या नवीन जोडीदारासोबात खूप खुश आहे. राखी सावंतच्या नव्या बॉयफ्रेंडची चर्चा सर्वत्र जोरात सुरू आहे.

राखीला मिळाला नवा बॉयफ्रेंड;

काही दिवसांपूर्वी राखी सावंतने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून ती आता सिंगल नसून आदिलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जगासमोर जाहीर केले. एका इंटरव्ह्यू मध्ये बॉयफ्रेंडसोबत सोबत असताना पापाराझींनी राखीला बिग बॉसच्या आगामी सीझनबद्दल विचारले. यावर राखी म्हणाली- मी बॉयफ्रेंडसोबत जावे असे तुम्हाला वाटते का? राखी आदिलचा उल्लेख यावेळी तिचा बॉयफ्रेंड म्हणून केला होता.

Rakhi Sawant
नागपूरात भुखंडाची हेराफेरी, 18.22 कोटींची फसवणूक, चार जणांच्या घराची झडती

राखी सावंत तिच्या नवीन बॉयफ्रेंडचे कौतुक करताना ती म्हणाली - जब ऊपर वाला देता है तो छप्पड फाडकर देता है और ईश्वर ने मुझे दे दिया है. आदिल एक SweetHeart हैं.

प्रियकराने राखीला दिली आलिशान BMW कार;

तिच्या नवीन कारबद्दल बोलताना राखी म्हणाली की, आदिलने तिला इतकी महागडी आलिशान कार दिली आहे. माझ्या प्रियकराने मला ही गाडी दिली आहे.

त्याचवेळी, एका कार्यक्रमातील राखी सावंतचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये राखी जगासमोर आदिलसोबत तिचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. राखी सावंत म्हणाली- आदिल मी तुझ्यावर प्रेम करते. तू माझं हार्ट आहेस. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच जर कोणी माझ्यावर खरे प्रेम केले असेल तर तो आदिल आहे.

तिच्या नवीन बॉयफ्रेंडबद्दल बोलताना राखी पुढे म्हणते – आदिल तो आहे, जेव्हा मी डिप्रेशनमध्ये होतो, तेव्हा त्याने मला साथ दिली आणि काही चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखले. आदिल आणि त्याच्या बहिणीने माझा मूड रिफ्रेश करण्यासाठी मला एक बीएमडब्ल्यू कार भेट दिली, कारण त्यांना मी छोट्या कारमध्ये प्रवास करणे आवडत नाही. राखी म्हणली, मला एक चांगला मुलगा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com