नागपूरात भुखंडाची हेराफेरी, 18.22 कोटींची फसवणूक, चार जणांच्या घराची झडती

नागपूर पोलीसांच्या आर्थिक शाखेची झाडाझडती
fraud
fraudSaamTVNews
Published On

संजय डाफ

नागपूर : जमीन विक्रीच्या नावाखाली १८.२२ कोटींची फसवणूक प्रकरणात नागपूर पोलिसांच्या आर्थिक शाखेने चार जणांच्या घरांची झाडाझडती घेतली आहे. यामध्ये सीएम नारायण डेमले, विजय रमाणी, गौरीशंकर सच्चानी आणि कमलेश दाढे यांच्या घरांचा समावेश आहे.

fraud
धक्कादायक! पबजी खेळण्यात गुंतला अन् थेट इमारतीवरून खाली पडला

चिंचभवन परिसरातील जमीन विक्रीच्या नावाखाली व्यावसायिक अली आणि वासाडे यांची १८.२२ कोटींची फसवणूक केली आहे. न्यायालयाच्या आदेशाने सीए डेमले, त्यांचा मुलगा अतुल डेमले, विजय रमाणी, गौरीशंकर सच्चानी आणि कमलेश दाढे विरोधात गुन्हा सदर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून धाडसत्र राबवण्यात येत आहे. या धाडीत काही कागदपत्र सापडली आहेत अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, जमिनीचा व्यवहार करून सीए डेमले आणि रमाणीसह नागपुरातील अनेक लोकांची फसवणूक केलीय असा आरोप तक्रारदार नावेद अली यांनी केला.

हे देखील पाहा-

आरोपींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल;

तक्रारदार नावेद अली यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००६ ते २००८ या कालावधीत पाच हजार स्वेअर फूटसाठी ( ५००० sq. ft) पैसे देऊन आरोपींकडून जमीन खरेदी करण्यात आली. एका वर्षानंतर आठ एकर जागा सरकारी जागेत आहे हे माहित झाले. २०१७ SIT समोर आम्ही हे सर्व करून देऊ, असेही सांगितले. पण, काही झाले नाही, त्यामुळ गेल्या वर्षी पोलिसांत तक्रार दिली, प्रकरण कोर्टामध्ये गेले. कोर्टाने आदेश दिले. त्यानुसार, पाच आरोपींविरोधात पोलिसांनी एफआयआर (FIR) दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com