Rakesh Bedi: बॉलिवूडमधील ‘धुरंधर’ या सुपरहिट चित्रपटामुळे ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘जमील जमाली’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली असून, चित्रपटाच्या शेवटामुळे सगळे थक्क झाले आहेत. त्यामुळेच त्यांना मोठे बक्षीस मिळाल्याची चर्चा रंगली आहे.
बॉलीवुड हंगामाच्या बातमीनुसार, ‘धुरंधर’ आणि त्याच्या सिक्वेलच्या प्रचंड यशानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी राकेश बेदींना तब्बल 1 कोटी रुपयांचा बोनस दिल्याची बातमी समोर आली आहे. सुरुवातीला या फ्रँचायझीसाठी त्यांना सुमारे 50 लाख रुपये मानधन देण्यात आले होते. मात्र त्यांच्या अभिनयामुळे हे मानधन दुप्पट करण्यात आल्याचे सांगितले जाते.
‘जमील जमाली’ या पात्राने प्रेक्षकांवर जबरदस्त छाप पाडली. त्यांच्या प्रत्येक डायलॉग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. विशेष म्हणजे, मुख्य भूमिकेत असलेल्या कलाकारांइतकीच चर्चा राकेश बेदी यांच्या भूमिकेची झाली, यामुळे चित्रपटाला खऱ्या अर्थाने मोठा फायदा झाला. त्यामुळेच निर्मात्यांनी हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे असे बोलले जात आहे.
दरम्यान, या बोनसबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काही अहवालांनुसार, हा 1 कोटींचा बोनस निर्मात्यांकडून त्यांच्या कामाची दखल म्हणून देण्यात आला. तर दुसरीकडे, काही वृत्तांमध्ये या ही फक्त एक अफवा असल्याचे बोलले जात आहे.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ फ्रँचायझीने बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १,३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटात रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, संजय दत्त, आर. माधवन आणि अक्षय खन्ना यांनी उत्तम काम केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.