Raju Srivastava Health Update News In Marathi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raju Srivastava Health Update | राजू श्रीवास्तव कॉमेडीच्या मंचावर पुन्हा परतणार; जाणून घ्या हेल्थ अपडेट

Nandkumar Joshi

Raju Srivastava Health Update News In Marathi | मुंबई: कॉमेडीच्या विश्वातील किंग अशी ओळख असणाऱ्या राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. याबाबत अभिनेता शेखर सुमननंही ट्विट करून माहिती दिली आहे. देशभरातील चाहते राजूच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत. तो पुन्हा कॉमेडीच्या मंचावर परतेल, असा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

राजू श्रीवास्तवला (Raju Srivastava) जीममध्ये ट्रेडमिलवर चालताना हृदयविकाराचा झटका आला होता. तो खाली कोसळला होता. त्याला तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तो एम्समध्ये असून, शुद्धीवर आलेला नाही. त्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आहेत. राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांची टीम आणि त्याचे कुटुंबीय, तसेच निकटवर्तीय दररोज माहिती देत आहेत.

राजू लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. त्याचे कुटुंबीयही प्रार्थना करत आहेत. आता राजूच्या प्रकृतीसंदर्भात (Health Update) एक नवी अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, राजूची प्रकृती आता हळूहळू सुधारत आहे. त्यामुळे तो लवकरच बरा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जी व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर अख्ख्या जगाला हसवतेय, ती व्यक्ती इतकी सीरिअस राहू शकत नाही. तो लढवय्या आहे. परत येईलच, असा विश्वास राजू श्रीवास्तवचा खास मित्र सुनील पाल याने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केला होता. तर शेखर सुमन यानेही काल एक ट्विट करून राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. राजू श्रीवास्तव अद्याप शुद्धीवर आलेला नाही. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे, देशभरातील चाहते राजू श्रीवास्तव बरा व्हावा यासाठी मंदिरांमध्ये पूजा-अर्चा आणि प्रार्थना करत आहेत. कानपूरच्या मंदिरातही त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

राजू श्रीवास्तववर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमकडून त्याच्या प्रकृतीबाबत नवी माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, ब्रेन डेड झाल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला आहे. उपचारांसाठी पुढील २४ तास अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT