Raju Shrivastava Health Updates Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raju Shrivastava Health Updates: राजू श्रीवास्तव अद्याप शुद्धीत नाही; पत्नीने दिली मोठी अपडेट म्हणाली...

कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव मागील २८ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहे. १० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तवला जीममध्ये ट्रेडमिलवर चालताना हृदयविकाराचा झटका आला होता.

कोमल दामुद्रे

मुंबई: फिल्म इंडस्ट्रीतील कॉमेडियन स्टार राजू श्रीवास्तव बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे. गेल्या महिन्यात अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र २८ दिवस उलटूनही कॉमेडियन श्रीवास्तव शुद्धीवर आलेला नाही. माहितीनुसार, अलीकडेच राजू श्रीवास्तव शुद्धीत आला असून त्याने पती शिखा श्रीवास्तवच्या हाताला स्पर्श केल्याचे वृत्त होते. परंतु पत्नी शिखा श्रीवास्तवला विचारले असता याबाबतच्या वृत्ताला नकार देत अद्यापही राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगितले.

कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव मागील २८ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहे. १० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तवला जीममध्ये ट्रेडमिलवर चालताना हृदयविकाराचा झटका (Heart attack) आला होता. त्यानंतर राजूला दिल्लीतील एम्समध्ये आयसीयूत दाखल करण्यात आले होते. एम्समध्ये दाखल केल्यानंतर राजू श्रीवास्तवची अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर राजूच्या प्रकृतीबाबत (Health) अनेक अपडेट समोर आल्या आहेत. राजू श्रीवास्तवच्या कुटुंबासह, चाहते, निकटवर्तीय गेले अनेक दिवसांपासून राजू बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

सोशल मीडियावर राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत अनेक खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत. अलीकडेच यावर कुटुंबियानी आक्षेप घेतला आहे. दरम्यान राजू श्रीवास्तव शुद्धीत आला असून त्याने पती शिखा श्रीवास्तवच्या हाताला स्पर्श केल्याचं वृत्त समोर आले होते. परंतु पत्नी शिखा श्रीवास्तवने याबाबतचे वृत्त खोडून काढले आहे. मुलाखतीत शिखा श्रीवास्तवने सांगितले की, 'सध्या राजूची प्रकृती स्थिर असून तो व्हेंटिलेटरवर आहे. वैद्यकीय पथक सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राजू लवकर बरा व्हावा यासाठी आपल्या प्रार्थना सुरू असुद्यात, असे सांगितले आहे

काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तवची प्रकृती अचानक बिघडली. अलीकडेच, राजूच्या मेंदूला संसर्ग झाल्यानंतर डॉक्टर अधिक अॅलर्ट झाले आहेत. डॉक्टरांनी कुटुंबातील सदस्यांना आयसीयूमध्ये प्रवेशास बंदी केली होती. केवळ राजूच्या पत्नी शिखा श्रीवास्तवला आयसीयूमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती होती. राजूचे संपूर्ण कुटुंब तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहे. सोशल मीडियावर चाहते राजू श्रीवास्तव लवकर बरे होऊन घरी परतावेत, यासाठी प्रार्थना करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे १७ वे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

Asia Cup 2025 : संजू सॅमसनचं काय होणार? कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलं कडक उत्तर, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

Maharashtra Live News Update: सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

धार्मिकस्थळी नेत मोठ्या भावाकडून ३ वर्षीय बहिणीवर बलात्कार; घटना सीसीटीव्हीत कैद

Job Recruitment : एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियात ९०० हून पदासाठी भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT