Raju Kalakar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raju Kalakar : सोनू निगमच्या गाण्यामुळे रातोरात बनला स्टार, कोण आहे राजू कलाकार?

Who Is Raju Kalakar : सोनू निगमच्या गाण्यामुळे रातोरात स्टार बनलेला राजू कलाकार नेमका कोण, जाणून घेऊयात. सध्या त्याचे 'दिल पे चलाई छुरिया' गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Shreya Maskar

सध्या सोशल मीडिया 'दिल पे चलाई छुरिया' गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. सोनू निगमचे हे गाणे एका व्यक्तीने गाऊन तो रातोरात स्टार बनला आहे. त्याच्या गाण्याने सोशल मिडिया धुमाकूळ घातला आहे. राजू कलाकर (Raju Kalakar ) नावाच्या एका व्यक्तीने दगडाचे दोन तुटलेले तुकडे वाजवून हे भन्नाट गाणे गायले आहे. हे गाणे सोशल मिडिया तुफान व्हायरल होत आहे.

राजू कलाकरच्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगमने (Sonu Nigam) त्याची भेट घेतली आणि त्याचा सोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे राजू कलाकरच्या प्रसिद्धीत भर पडली आहे. राजू कलाकर आणि सोनू निगम 'दिल पे चलाई छुरिया' (Dil Pe Chalai Churiya) हे गाणे व्हिडीओत एकत्र गाताना दिसत आहेत. राजूने दोन दगड एकमेकांवर वाजवून सुरेल धून तयार केली यावर सोनू निगम आपल्या जादुई आवाजात गाणे गायले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मिडिया खूप व्हायरल झाला.

राजू कलाकरच्या गाण्यावर आणि सोनू निगमसोबतच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक राजू कलाकरच्या कलेचे कौतुक करताना दिसत आहेत. व्हिडीओत दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. 'दिल पे चलाई छुरिया' हा गाणे 1995मध्ये रिलीज झालेल्या 'सनम बेवफा' या चित्रपटातील आहे.

राजू कलाकार कोण ?

सोनू निगमसोबत गाणे गाऊन प्रसिद्ध झालेल्या व्यक्तीला सोशल मिडिया राजू कलाकार या नावाने ओळखले जाते. मात्र त्याचे खरे नाव राजू भट्ट असे आहे. तो राजस्थानचा असून गुजरात येथे राहतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT