Rajpal Yadav Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajpal Yadav: 'मला पुन्हा जेलमध्ये पाठवा...' चेक बाऊन्स प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राजपाल यादव भावूक; न्यायाधीशांनी फटकारले

Rajpal Yadav: राजपाल यादव ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. २ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान हा अभिनेता भावूक झाला, ज्यावरून न्यायाधीशांनी त्याला फटकारले.

Shruti Vilas Kadam

Rajpal Yadav: बॉलिवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता राजपाल यादव पुन्हा एकदा त्याच्या ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. या प्रकरणात अलीकडेच त्याला तुरुंगवास भोगावा लागला होता. मात्र नंतर त्याला अंतरिम जामीन मिळाला. आता या केसच्या सुनावणीदरम्यान घडलेल्या एका भावनिक प्रसंगामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती स्वरणा कांता शर्मा यांच्या एकलपीठासमोर सुरू आहे. न्यायालयाने याआधीच राजपाल यादव यांना थकीत रक्कम भरण्यासाठी अंतिम संधी दिली होती. त्यांनी काही रक्कम भरल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला होता. मात्र अद्याप मोठी रक्कम बाकी असल्याचे समोर आले आहे.

२ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राजपाल यादव भावनिक झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहून त्यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना दावा केला की, या प्रकरणामुळे त्याला मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्याला आपली प्रॉपर्टी विकावी लागली आहे. यावेळी “मला आणखी पाच वेळा तुरुंगात पाठवा,” असे उद्गार काढले. त्यांच्या या विधानामुळे कोर्टात काही काळ न्यायाधीश नाराज झाले.

या दरम्यान, न्यायाधीशांनी त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत त्यांना फटकारले. “न्यायालय सौजन्याने वागत असल्याचा गैरफायदा घेऊ नका,” असा इशारा देत न्यायालयाने स्पष्ट केले की, जर पैसे भरण्याची तयारी असेल, तर ती तात्काळ पूर्ण करावी. विरोधी पक्षाचे वकील अवनीत सिंग सिक्का यांनी सांगितले की, अद्याप सुमारे ७.७५ कोटी रुपये थकीत आहेत. दोन्ही पक्षांमध्ये समझोता करण्याचे प्रयत्न झाले. अगदी ६ कोटी रुपयांवर तोडगा काढण्यावर कोर्टात सुनावणी झाली.

दरम्यान, राजपाल यादवने ६ कोटी रुपयांची परतफेड करण्यासाठी आणि हा वाद मिटवण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती केली होती; परंतु न्यायाधीशांनी ही विनंती फेटाळून लावली. न्यायमूर्ती शर्मा यांनी स्पष्ट केले, "नाही म्हणजे नाहीच. मी माझा आदेश राखून ठेवत आहे. मी आता यापुढे कोणतीही मुदत देणार नाही." तूर्तास, राजपाल यादवला दिलासा मिळेल की त्याच्या अडचणी आणखी वाढतील, हे अद्याप अस्पष्ट आहे. न्यायालयाचा आदेश आल्यानंतरच हे स्पष्ट होईल. येत्या काही दिवसांत येणाऱ्या अंतिम निकालाद्वारे या प्रकरणाचा निर्णय घेतला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ananya Panday: बे इज बॅक; अनन्या पांडेने केला लूक चेंज, पाहा ग्लॅमरस फोटो

Maharashtra Live News Update : नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Tariff: जगात पुन्हा खळबळ; ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब; भारतावर काय होणार परिणाम?

मराठा-धनगर समाजाला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतोय का? अंजनगाव प्रकरणावर मनोज जरांगे पाटलांना वेगळाच संशय

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळा इतक्या रुपयांवर पोहचलं; वाचा २२ अन् २४ कॅरटचे दर

SCROLL FOR NEXT