Shrikanth Film Day 1 Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shrikanth Film : राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग, जाणून घ्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल

Shrikanth Film Day 1 Box Office Collection : ‘श्रीकांत’ चित्रपटातील राजकुमारच्या अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. चित्रपटाला प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग-डेला दमदार प्रतिसाद मिळाला आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. नुकताच त्याचा ‘श्रीकांत’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे. राजकुमारच्या या चित्रपटाला प्रेक्षकाकंडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील राजकुमारच्या अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. चित्रपटाला प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग-डेला दमदार प्रतिसाद मिळाला आहे. जाणून घेऊयात चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल...

राजकुमार रावच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.२५ कोटींची कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे बजेट ४० कोटी रुपये आहे. चित्रपटाने ओटीटी राईट्ससह अन्य बाबतीत उत्तम कमाई केलेली आहे. चित्रपटाच्या कमाई वीकेंडला वाढ होईल,असा अंदाज लावला जात आहे. राजकुमार रावच्या चित्रपटांनी यापूर्वीही चांगली कमाई केली आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाकडूनही खूप अपेक्षा ठेवल्या जात आहेत.

‘श्रीकांत’ चित्रपटाचे कथानक नेत्रहीन उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनावर आधारित आहे. तुषार हिरानंदानी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. राजकुमार रावने श्रीकांत बोल्ला यांची मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या कथानकाचे आणि अभिनयाचे सध्या चाहते कौतुक करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मोदी सरकारचं शेतकऱ्यांना ४२००० कोटींचं गिफ्ट! दोन दिवसांत करणार मोठी घोषणा

Political News : मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निवडणुकीआधीच माजी मंत्र्याने पक्षाची साथ सोडली

Sachin Pilgaonkar: 'उर्दू ही हिंदूंचीच भाषा...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

Maharashtra Live News Update: नागपूर मधील सह दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी निलंबित

'कंटाळा आल्याने आईला संपवलं', लेकाकडून हादरवणारं कृत्य, नाशिकमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT