Jailer Crossed 100 Crore Twitter / @Jailer_Movie
मनोरंजन बातम्या

Jailer Box Office Collection: रजनीकांतच्या चित्रपटाचा धुमाकूळ; 'जेलर' 3 दिवसात ओलांडणार 100 कोटींचा टप्पा

Rajinikanth Movie Collection: रजनीकांतचा 'जेलर' हा चित्रपट गुरुवारी १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला.

Pooja Dange

Jailer Crossed 100 Crore: सुपरस्टार रजनीकांतच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रजनीकांतचा 'जेलर' हा चित्रपट गुरुवारी १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. उभा चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ४८.३५ कोटींची कमाई केली आहे.

रजनीकांत यांचा 'जेलर' हा तामिळमधील यावर्षीचा सर्वत जस्ट कामे करणार चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसात अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. पहिल्या दिवशी ४८. ३५ कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २७ कोटींची कमाई केली आहे.

'जेलर' चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन ७५.३५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर जगभरात यात चित्रपटाने ९६. ६ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या तीन दिवसात चित्रपट देशांतर्ग कलेक्शनमध्ये १०० कोटींचा आकडा ओलांडेल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी शनिवारी या चित्रपटाचे कलेक्शन ३० कोटी रुपयांपर्यंत व्हायला हवे.

नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने शुक्रवारी ६९.१२ टक्के कलेक्शन फक्त तामिळमधून केला आहे. जेलर चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर सर्वच भाषांमध्ये हा चित्रपट कमाल करत आहे. (Latest Entertainment News)

या शुक्रवारी तीन चित्रपट प्रदर्शित झाले, सानी देओलच्या गदर २, अक्षय कुमारचा OMG २ आणि चिरंजीवीचा भोला शंकर. या तीन चित्रपटांपैकी सनी देओलच्या 'गदर २'ने ४०, अक्षय कुमारच्या 'OMG २'ने ९. कोटी तर चिरंजीवी यांच्या 'भोला शंकर' चित्रपटाने २० कोटी कमावले आहेत. तर आता पहिल्या वीकेंडला या चित्रपटाचे कलेक्शन किती असेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT