Rajinikanth Movie Advance Ticket Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajinikanth Movie Ticket: रजनीकांतचा जब्बरा फॅन! Coolie च्या तिकिटासाठी बारापट पैसा खर्च केला, किंमत वाचून धक्का बसेल

Rajinikanth Movie Advance Ticket: रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित ‘कुली’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस उरले असतानाच त्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

Shruti Vilas Kadam

'कुली'चे देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमी आगाऊ बुकिंग

तामिळनाडूमध्ये पहिल्या दिवसाच्या शोच्या तिकिटांची किमती ४,५०० रुपयांपर्यंत वाढली

सरकारी नियमांना न जुमानता तिकिटांचा काळाबाजार सर्रास सुरू

Rajinikanth Movie Advance Ticket: रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित ‘कुली’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस उरले असतानाच त्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. बेंगळुरूमधील काही सिनेमागृहांमध्ये पहिल्या दिवशी पहिल्या शोचे तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांनी अक्षरशः स्पर्धा लावली आहे. या स्पर्धेचे उदाहरण म्हणजे पहिल्या शोचे तिकीट मिळवण्यासाठी एका चाहत्याने एका तिकीटाची ४,५०० रुपये इतकी प्रचंड किंमत मोजली आहे.

कर्नाटकमध्ये चित्रपट तिकीट दरांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे लोकप्रिय चित्रपटांच्या वेळी तिकीट दर बाजारातील मागणीनुसार वाढतात. त्यामुळे ‘कुली’ सारख्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटासाठी तिकीटांचे भाव आकाशाला भिडले आहेत. या तुलनेत, तामिळनाडूमधील चेन्नई येथे मात्र सरकारकडून तिकीट दरांवर कडक मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तिथे पहिल्या शोचे अधिकृत तिकीट फक्त ५७ रुपये इतक्या नाममात्र दरात उपलब्ध आहे. हा प्रचंड तफावत सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला आहे.

रजनीकांत यांच्यासाठी चाहत्यांचे प्रेम

रजनीकांत यांच्या चित्रपटांबद्दलचा चाहत्यांचा वेडापिसा उत्साह हा नवा नाही. प्रत्येक नवीन चित्रपटाच्या वेळी त्यांचे चाहते फटाके फोडणे, बॅनर लावणे, पहिल्या शोसाठी रांगा लावणे, मंदिरात पूजा करणे अशा वेगवेगळ्या प्रकारांनी आपले प्रेम व्यक्त करतात. ‘कुली’साठीही अशीच दृश्ये पाहायला मिळत असून, बेंगळुरूमध्ये अनेक चाहत्यांनी तिकिटे मिळवण्यासाठी काही दिवसांपूर्वीपासून सिनेमागृहाबाहेर थांबण्यास सुरुवात केली आहे.

‘कुली’ची आतापर्यंतची कमाई

चित्रपट उद्योगातील जाणकारांच्या मते, ‘कुली’चा पहिल्याच दिवशीचा बॉक्स ऑफिस कलेक्शन विक्रमी ठरण्याची शक्यता आहे. रजनीकांत व दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या कुलीने आतापर्यंत ७३३९ शोसाठी ८९५९९१ तिकिटे विकली गेली आहेत आणि या चित्रपटासाठी आतापर्यंत १९.२९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

Organic Incense Sticks : सुगंधीत धूप विकत कशाला? घरीच ऑरगॅनिक धूपच्या कांड्या करा तयार

29 ऑगस्टला होणाऱ्या मराठा मोर्चासाठी गावागावात बैठका सुरू पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT