Rajinikanth and Amitabh Bachchan after 32 years for Thalaivar 170: थलायवा रजनीकांत लवकरच ‘जय भीम’ चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात रजनीकांतसोबत बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन देखील असणार असल्याची देखील बातमी मिळत आहे. जर हे दोन्हीही अभिनेते एकत्र आले तर, ही जोडी तब्बल ३२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. रजनीकांत स्टारर चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना अप्रोच करण्यात आल्याची सध्या बातमी मिळत आहे.
एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, रजनीकांत यांच्या जवळच्या सूत्राने टीजे ज्ञानवेलच्या या नवीन चित्रपटाबद्दल माहिती दिली. या चित्रपटाकरिता अमिताभ बच्चन यांच्याशी ही बोलणी सुरू असल्याचे ही सांगितले जात आहे. लवकरच या चित्रपटाची घोषणा केली जाणार आहे.
या चित्रपटासाठी अद्याप कोणत्याही अधिकृत करारावर स्वाक्षरी झालेली नाही, अशी माहिती सुत्रांनी दिले. जर हे दोघेही रूपेरी पडद्यावर एकत्र दिसले तर, अमिताभ बच्चन आणि रजनीकांत ही जोडी तब्बल ३२ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार आहे. १९९१ मध्ये आलेल्या ‘हम तुम’ या हिंदी चित्रपटात हे दोघे एकत्र दिसले होते. आता त्यानंतर या चित्रपटात एकत्र दिसण्याची शक्यता आहे.
टीजे ज्ञानवेलचा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून रजनीकांत मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. अमिताभ आणि रजनीकांत यांनी एकत्र काम केलेल्या चित्रपटांमध्ये ‘हम तुम’, ‘गिरफ्तार’ आणि ‘अंधा कानून’ या चित्रपटांचा समावेश आहे.
रजनीकांत सध्या ‘जेलर’ आणि ‘लाल सलाम’ च्या चित्रपटात व्यस्त आहे. हे दोन्ही चित्रपट पूर्ण केल्यानंतर तो टीजे ज्ञानवेलच्या चित्रपटाच्या कामामध्ये व्यग्र होणार आहे. रजनीकांत यांचा हा १७० वा चित्रपट असल्याने त्याचे नाव सध्या तरी ‘थलायवा १७०’ असे ठेवण्यात आले आहे. यापूर्वी हा चित्रपट अभिनेता विक्रमला ऑफर करण्यात आला होता, मात्र आता त्याच्या जागी बिग बी अमिताभ बच्चन दिसणार असल्याच्या सध्या चर्चा आहे. अमिताभ बच्चन सध्या ‘सेक्शन ८४’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. रिभू दासगुप्ता त्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.