Hemangi Kavi Accident During Shooting
Hemangi Kavi Accident During ShootingInstagram @hemangiikavi

Hemangi Kavi Post : सुजलेला पाय आणि नाटकाचा पहिला प्रयोग... अभिनेत्री हेमांगी कवीने सांगितल्या कलाकाराच्या वेदना

Hemangi Kavi Share Her Experience : शूटिंग करत असताना हेमांगीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
Published on

Hemangi Kavi Accident :अभिनेत्री हेमांगी कवी सध्या 'मन धागा धागा' या मालिकेतून आपल्या भेटीला येत आहे. हेमांगी या मालिकेत काही भागांसाठीच असणार आहे. दरम्यान या मालिकेच्या शूटिंग वेळी हेमांगीला दुखापत झाली आहे.

शूटिंग करत असताना हेमांगीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापत असताना देखील तिने शूटिंग पूर्ण केले. तसेच दुसऱ्या दिवशी 'जन्मवारी' नाटकाचं पहिला प्रयोग देखील यशस्वीरित्या केला.

हेमांगी कवीने सोशल मीडियावर पोस्ट करत सगळी हकिकत सांगितले आहे. हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'परवा ‘मन धागा धागा’ च्या सेटवर सीन करताना माझ्याकडूनच माझ्या पायाला दुखापत झाली. पायरी चढत असताना माझा अंदाज चुकला आणि पाय पायरीला जोरात आपटला. पायाच्या बोटाचं नख माझ्याच बोटात मागच्या मागे घुसलं. असली कळ गेली डोक्यात.

Hemangi Kavi Accident During Shooting
Rubina Dilaik Reaction On Car Accident: 'अपघातामुळे माझ्या डोक्याला दुखापत...' कार अपघातानंतर रुबिना दिलैकची धक्कादायक प्रतिक्रिया

शूटिंग थांबवून आराम करायची ती वेळ नव्हती कारण आधीच खूप उशीर झाला होता. पॅकअपची वेळ उलटून गेली होती. म्हटलं आता जर मी माझ्या पायाला गोंजारत बसले तर जशी ती कळ माझ्या डोक्यात गेलीए तशी मी सगळ्यांच्या डोक्यात जाईल. काही नाही काही म्हणत सीन पूर्ण केला. पॅकअप झालं.

पाय झणझणत होता. चालवत ही नव्हतं. चप्पल घलता येत नव्हती. कशी बशी घरी पोचले. घरी आल्यावर बघते तर काय पाय टम्म सुजला होता. फ्रेश होऊन बर्फाचा शेक दिला पण मी इतकी थकले होते की मी झोपून गेले. काही वेळापुरतीच. थोड्या थोड्या वेळाने सारखी जाग येत होती. पाय प्रचंड झोंबत होता.

पण यापेक्षा पाय जर असाच राहीला तर उद्याचा नाटकाचा प्रयोग कसा करणार या विचाराने अस्वस्थ होऊन माझी झोपमोड होत होती. सकाळी पुन्हा बर्फ लावला. नाटकाच्या रिहर्सलला पोचले. मी लंगडतेय पाहून सगळेच काळजीत पडले. माझ्याही आणि उद्याच्या प्रयोगाच्याही! तिथेही मनाचा हीय्या करून आई गं आई गं करत रिहर्सल केली. आराम न दिल्यामुळे जखम खवळली. (Latest Entertainment News)

Hemangi Kavi Accident During Shooting
Ranbir Kapoor's Animal Pre-Teaser Out : ॲनिमल प्री-टीजर प्रदर्शित: रणबीरचा थरार पाहून अंगावर येईल काटा

आता म्हटलं हीचा दादापूता नाही केला तर ही मला उद्याचा प्रयोग करू द्यायची नाही. घरी गेल्या गेल्या मैत्रिणीने सुचवलेला तुरटी-हळदीची लेप लावला पायाला. दुखणं शांत झालं. रिहर्सल चांगली झाली होती म्हणून झोप ही पटकन लागली आणि चांगली झाली.

प्रयोगाचा दिवस उजाडला. रक्त साकळून बोट काळं निळं झालं होतं. मनात म्हटलं काही नाही, काल जशी लंगडत तालिम केली तसाच आज प्रयोगही करायचा. लंगडल्यामुळे दुसरा पाय ही दुखू लागला. थिएटरला पोहोचले. मेकअप, कॉस्ट्यूम घालून तयार झाले. सगळे माझ्या दुखण्याचं, लंगडण्याचं सांत्वन करत होते.

मी विंगेत उभी होते. तिसरी घंटा झाली. पडदा उघडला. संगीत सुरू झालं. लाईट्स आले आणि मी प्रवेश केला. नाटकाच्या सुरुवातीलाच मी धावत ट्रेन पकडतेय असा सीन आहे.

मी धावले आणि त्यानंतरचे २- २.१५ तास मी रंगमंचावर तरंगत होते. मला दुखापत झालीए. माझे पाय दुखतायेत. हवा लागली तरी सहन होत नाहीए हे सगळं सगळं विसरून गेले मी. काय गंमत झाली?…

काही तासांपूर्वी विव्हळणारी मी जणू काही झालंच नाही अशी वावरले. जादू व्हावी तसं. पण खरंच आहे ही जादूच असते. कलेची जादू. परकाया प्रवेशाची जादू. त्यावेळी साकारत असलेल्या पात्रामध्ये आपण उरतच नाही. त्यामुळे आपली दुःखं, यातना, क्लेश शारिरीक आणि मानसिक वेदना सुद्धा काही काही उरत नाही आपल्यात. या गोष्टीचा मला फायदा झाला. प्रयोग संपल्यावर मला जाणवलं माझं दुखणं खुप कमी झालं होतं.

या क्षेत्राची मला हीच गोष्ट आवडते. वेगवेगळी पात्र केल्यामुळे, करताना आपल्या वैयक्तिक दुखांमधून पटकन सावरता येत आम्हांला. मला वाटतं फक्त अभिनय क्षेत्रच नाही तर जगातली कुठलीही कला तुम्हांला सावरायला मदतच करते. तिने पुढे केलेला मदतीचा हा हात धरायचा की नाही हे आपल्या हातात असतं.

‘जन्मवारीचा’ पहिला प्रयोग माझ्या कायम स्मरणात राहील. कलादेवता, नाट्यदेवता कालच्या सारखी कृपा कायम ठेवा माझ्यावर!'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com